माधुरी दीक्षितने खरेदी केली भारतातली सर्वात महागडी कार.. लक्झरी गाड्यांचे कलेक्शनमध्ये माधुरी सर्वात टॉप एक्टरेस

धक धग गर्ल म्हणून संपूर्ण बॉलीवूडवर एकेकाळी राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने सध्या तिच्या कार कलेक्शनमुळे चांगलीच चर्चेत आहे. स्टार माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ श्रीराम नेने यांनी काल मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर फेरारी 296 GTS हि भारतातील सर्वात महागडी कार घेतली आहे. इतकंच नाही तर ह्या कारमध्ये बसून त्यांनी लॉन्ग टूर देखील एन्जॉय केली आहे. काल मुंबईत त्यांनी फेरारी 296 GTS घेतल्यांनंतर पुणे मुंबई एक्सप्रेस रस्त्यावर ह्या गाडीच्या वेगाचा आनंद देखील लुटला आहे.
फेरारी 296 GTS Rosso Corsa ही दोन आसनी कार आहे ह्या कारची एकूण किंमत 6.24 कोटीहून अधिक आहे. या आलिशान मशीनमध्ये शक्तिशाली 2992 cc इंजिन आहे आणि ते विविध 14 रंगांमध्ये येते. पण माधुरीने लाल रंगच निवडला जो तिचा फेव्हरेट रंग देखील आहे. लक्झरी गाड्यांचे कलेक्शन असणाऱ्या माधरी दीक्षितकडे मर्सिडीज-मेबैक एस560, रेंज रोवर वोग, पोर्श 911 टर्बो अशा आलिशान गाड्या आहेत. त्यात आता 6 कोटींची फेरारी खरेदी करून तिने या नवीन वर्षाची सुरुवात केली आहे.

पती डॉ श्रीराम नेने बऱ्याच वर्षांपासून भारतात असल्याने माधुरी देखील आता बॉलीवूडमध्ये सक्रिय असलेली पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी तिने बकेटलीस्ट हा मराठी चित्रपट देखील केला होता. पण त्यानंतर मात्र ती मराठी सिनेमांत पाहायला मिळाली नाही. चांगली स्क्रिप्ट असेल तर मी नक्कीच मराठी चित्रपट करेल असं देखील ती म्हणाली होती त्यामुळे पुन्हा ती मराठी चित्रपट करेल अशी आशा तिच्या चाहत्यांना लागून आहे.