
मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रसिद्ध कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. सुरुची अडारकर आणि पियुष रानडे नंतर अभिनेता ध्रुव दातार तर गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायण अशा सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधून वर्षाचा शेवट गोड केलेला पाहायला मिळाला. तर लवकरच प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडे विवाहबंधनात अडकणार असल्याने सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. गौतमी देशपांडे हिने काही वेळापूर्वीच सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. गौतमी ज्याच्यासोबत लग्न करतीये त्याचं नाव आहे स्वानंद तेंडुलकर. गौतमी आणि स्वानंद दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

त्यांच्या या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. स्वानंद आणि गौतमी हे दोघेही अनेकदा एकत्र पाहायला मिळाले. देशपांडेच्या एका कौटुंबिक लग्नसोहळ्यात स्वानंदने गौतमीसोबत हजेरी लावली होती. त्या सोहळ्यातील काही खास फोटो गौतमी आणि मृण्मयीने सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हाच गौतमी सोबत स्वानंद काय करतो? अशी चर्चा रंगू लागली. तेव्हा हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे समजले होते. सई ताम्हणकरने देखील त्यांच्या त्या खास फोटोवर अशाच प्रकारची एक कमेंट करून लक्ष वेधले होते. दरम्यान आता गौतमी आणि स्वानंदने त्यांचे हे प्रेम जगजाहीर केले आहे. एक खास फोटोशूट करत या दोघांनी एकमेकांसोबतच्या प्रेमाची कबुली दिलेली पाहायला मिळत आहे. त्यांच्या या गोड बातमीवर मराठी सेलिब्रिटींनी देखील अभिनंदन करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान गौतमी सध्या गालिब या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सारे तुझ्याचसाठी आणि माझा होशील ना या मालिकेतून गौतमी प्रमुख भूमिकेत झळकली होती.

तर स्वानंद तेंडुलकर हा अभिनेता तसेच डिजिटल क्रिएटर आहे. भाडीपा या डिजिटल मीडियाचा तो व्हॉइस प्रेसिडेंट आहे. एकाच इंडस्ट्रीत काम करत असल्याने दोघांची ओळख झाली या ओळखीचे आता लवकरच नात्यात रूपांतर होणार आहे. प्रेमाच्या या कबुलीनंतर गौतमी आणि स्वानंद लवकरच लग्न करणार आहेत. ‘गेटिंग मॅरीड’ असे म्हणत गौतमीने या लग्नाची बातमी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच गौतमी आणि स्वानंद लग्नबंधनात अडकलेले पाहायला मिळतील. काल गौतमीची बहीण मृण्मयी देशपांडे हिने गौतमी आणि स्वानंदसाठी केळवणाचा बेत आखला होता.