ज्याने ‘कलावंत’ पथक सुरू केलं त्याचीच या पथकातून ‘एक्झिट’…अभिनेत्याचे सोशल मीडियावरच केलं जाहीर

पुण्यातील मानाच्या गणपतीची मिरवणूक हा पुणेकरांसाठी एक खास सोहळा मानला जातो. या सोहळ्यात सहभागी होणारे ‘कलावंत ढोलताशा पथक ‘ पाहण्यासाठी ठिकठीकाणहून गर्दी केली जाते. त्यामुळे कलावंत ढोल ताशा पथक हे पुणेकरांचे एक खास आकर्षण ठरले आहे. २०१४ साली या ढोल ताशा पथकाची स्थापना करण्यात आली. सौरभ गोखले, अनुजा साठे, आस्ताद काळे, श्रुती मराठे या कलाकारांनी एकत्र येऊन या ‘कलावंत’ पथकाची स्थापना केली. २०१४ पासून दरवर्षी गणोशोत्सवात हे पथक आपली कला सादर करत असतं. या पथकामध्ये सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, अजय पूरकर असे बरेचसे सेलिब्रिटी पाहायला मिळाले आहेत. पण या पथकातून मुख्य कलाकारानेच काढता पाय घेतल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे.

सोशल मीडियावर या अभिनत्याची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. लवकरच गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे सर्व ढोल ताशा पथकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आपले पथक सरस कसे ठरेल याची चढाओढ या पथकांमध्ये पाहायला मिळत असते. पण सर्वांचे आकर्षण असलेले कलावंत ढोल ताशा पथकाला मात्र कुठेतरी तडा गेलेला पाहायला मिळत आहे. हे कलावंत पथक सुरू करण्यामागे आस्ताद काळेचा मोठा वाटा होता. पथकाचे नियोजन कसे करायचे, सरावासाठी जागा कुठे निवडायची याची जबाबदारी तो समर्थपणे पार पाडत होता. मात्र आता इथून पुढे मी या पथकात नसणार असेच आस्तादने सोशल मीडियावर जाहीर केले आहे. “नमस्कार. मी “कलावंत पथक” सोडलं आहे. या पथकाशी, त्याच्या मिरवणुकांशी, वादनांशी माझा काहीही संबंध नाही. तेव्हा नवीन सभासद नोंदणी, तालमींचं वेळापत्रक, मिरवणुका इ. संबंधी मला संपर्क करू नये. धन्यवाद.” असे म्हणत आस्तादने याबद्दल एक नाराजीच जाहीर केलेली पाहायला मिळत आहे.

पण यावरून सेलिब्रिटी विश्वात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आस्ताद काळे त्याच्या या पोस्टमधून कुठेतरी नाराज असलेला पाहायला मिळतो आहे. तडकाफडकी पथक सोडण्यामागचे नेमके कारण काय आहे यावर अनेकांना प्रश्न पडले आहेत. दरम्यान अस्तादची ही नाराजी लवकरच दूर होवो अशी सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहे. सेलिब्रिटींचे कलावंत पथक हे पुण्यातील गणपतीच्या मिरवणूकीतील एक शान आहे. याची सेवा भक्तांना अविरतपणे पाहायला मिळो आधीच एक अपेक्षा आहे. त्यामुळे कलाकारांनी आपापसातले वाद मिटवून पुन्हा एकत्र यावे आणि एक छान कलाकृती सादर करावी.