news

सूरज चव्हाणच्या झापुक झुपुककडे प्रेक्षकांची पाठ…पहिल्याच दिवशी चित्रपटाला कमी प्रतिसाद

आज २५ एप्रिल रोजी बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपुक’ चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुरजला हिरो बनवून प्रेक्षकांच्या भेटीला आणले. पण प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळाली. काही ठिकाणी चित्रपटाची मोजकीच तिकिटं बुक करण्यात आली तर काही ठिकाणी मात्र अख्ख थिएटरच रिकामं असलेलं पाहायला मिळालं. तर महाराष्ट्रभर या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळालेला दिसून आला. चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रेक्षकांना आवाहन केले होते. पण पहिल्या दिवशी तरी प्रेक्षकांनी या चित्रपटाला नाकारलेले दिसून आले.

मराठी बिग बॉसचा ५ वा सिजन सुरू असतानाच केदार शिंदे यांनी या चित्रपटाबद्दल सुरजच्या नावाचा विचार केला होता. बिग बॉसमध्ये असताना त्याला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याचा साधेपणा, भोळा स्वभाव पाहून तोच या सिजनचा विनर व्हावा अशी प्रेक्षकांची इच्छा होती. गरिबीत वाढलेला सूरज या विजयामुळे तरी त्याला आर्थिक हातभार लागेल म्हणून लोकांकडून त्याला सहानुभूती मिळाली. अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सुरजला घर बांधून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्याची हीच लोकप्रियता पाहता सुरजला चित्रपट देऊन केदार शिंदे यांनी त्याचं भविष्य उज्वल करण्याचा छोटासा प्रयत्न केला.

suraj chavan zapuk zupuk movie
suraj chavan zapuk zupuk movie

अवघ्या अडीच महिन्यात झापुक झुपुक चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून आज तो प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मी केदार शिंदे यांचा किती ओरडा खाल्ला हे तो न घाबरता सांगताना दिसला. अर्थात ही चूक आपलीच आहे हे लक्षात आल्यानंतर सूरज त्यांना मिठीही मारायचा. आज पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे मात्र शनिवार आणि रविवारी प्रेक्षक या चित्रपटाकडे नक्की वळतील असा विश्वास वाटतो. आज चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवला या प्रश्नापेक्षा सुरजवर प्रेक्षकांनी किती प्रेम केलं हेही तेवढंच महत्वाचं आहे नाही का!.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button