news

ठराविक लोकांकडून माझ्या चित्रपटावर बंदीची मागणी….सर्व मार्ग बंद होत असताना सूरज चव्हाणची चाहत्यांना विनंती

मराठी बिग बॉसच्या ५ वया सिजनचा विजेता झाल्यानंतर सूरज आतास ‘राजाराणी’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकताना दिसत आहे. हा चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. पण अवघ्या ४ दिवसात या चित्रपटावर बंदी घाला अशी मागणी काही ठराविक लोकांकडून केली जात आहे. शिवाजी दोलताडे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून राजाराणी चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. प्रेमाचं भयाण वास्तव दाखवणारी ही प्रेमकथा प्रेक्षकांना पाहता यावी म्हणून दोन वर्षांपासून या सिनेमावर काम चालू होतं.

सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे जाहीर झाले तेव्हा सुरजही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होता. रोहन पाटील यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून सूरजलाही या चित्रपटाने अभिनयाची मोठी संधी देऊ केली आहे. पण आता हा चित्रपट बंद करावा अशी मागणी काही लोकांनी केली असल्याने सुरजने स्वतः समोर येऊन चाहत्यांना विनंती केली आहे. या चित्रपटासाठी सर्वच कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे. एका सामान्य लोकांनी बनवलेल्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांनी आपुलकी दाखवावी. सुरजला त्याच्या चाहत्यांनी पाठिंबा द्यावा असे मत यांनी व्यक्त केलं आहे. बीग बॉसच्या घरात त्याला जसा पाठिंबा दिला तसा चित्रपटासाठीही द्यावा अशी विनंती दिग्दर्शक निर्मात्यांनी केली आहे.

raja rani marathi film suraj chavan
raja rani marathi film suraj chavan

काही कारणास्तव या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली होती. सर्व संकटं पार करत १८ ऑक्टोबर रोजी राजाराणी चित्रपट रिलीज झाला पण आता चित्रपटावर बंदीची मागणी होत असल्याने सर्वच कलाकार हतबल झालेले आहेत. समोरून सर्व मार्ग बंद होत असताना आता प्रेक्षकच आपल्याला या संकटातून बाहेर काढू शकतील असे मत सूरज आणि चित्रपट टीमने मांडलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button