आज बिग बॉसच्या घरात दुसऱ्या कॅप्टनसीचा टास्क पार पडणार आहे. अंकिता वालावलकर हिला बिग बॉसचा पहिला कॅप्टन बनण्याचा मान मिळाला. काल पार पडलेल्या कार्यात ए टीम विजेती ठरली त्यामुळे ए टीमच्या सदस्यांना कॅप्टन बनण्याचा मान मिळाला आहे. पण इथेही कोण कॅप्टन होणार म्हणून चुरशीची लढत सुरू आहे. अरबाजला सगळ्यात जास्त मतं मिळाली पण बिग बॉसने इथे एक ट्विस्ट देऊन हे कार्य अधिक रंजक केले आहे. सगळ्यांना जेवढी मतं मिळाली तेवढे फ्रेंच फ्राईज बॅगेत ठेवले आहेत. त्या बॅगा प्रत्येकाला जपून ठेवायच्या आहेत. पण आता कोणाकडे जास्त फ्राईज असतील त्यालाच या आठवड्यात कॅप्टन बनता येणार आहे.
काल टास्क जिंकल्यानंतर सुरजने कॅप्टन बनण्याची इच्छा व्यक्त केली पण त्याला म्हणावी तशी मतं मिळाली नाही. पण आता या पदासाठी कोणाकडे जास्त वस्तू असतील तो कॅप्टन घोषित करणार आहे. त्यासाठी सूरज सगळ्यांना भिडलेला पाहायला मिळाला आहे. सूरज चक्क अरबाजलाच भिडल्याने त्याच्या चाहत्यांनी त्याचं मोठं कौतुक केलं आहे. अरबाज, निक्की, जान्हवी कडून तो वस्तू हिसकावून घेत आहे. त्याचा हा खेळातला सहभाग पाहून आता सूरज नीट खेळतोय अशी प्रतिक्रिया मिळत आहे. घाबरायचं नाही नडायचं हा त्याचा डायलॉग तो प्रत्यक्षात अनुभवत आहे. इतके दिवस सूरज बिग बॉसच्या घरात लाजरा बुजरा झाला होता.
त्याला हा खेळ काय आहे हेच मुळात माहीत नव्हते त्यामुळे सूरज टास्क खेळू शकणार नाही असे म्हटले जात होते. तो गरिब आहे खरा आहे म्हणून त्याला मत द्यायचे का? असा प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित केला होता. मात्र आता सूरज दिलेले टास्क उत्तम खळतच नाही तर तो अरबाज, निक्की, जान्हवी सारख्या तगड्या स्पर्धकांना टक्कर देत आहे. त्याचा हा अग्रेसिव्हपणा पाहून जान्हवी आणि निक्की मात्र पुरत्या घाबरलेल्या पहायला मिळत आहेत. सुरजचा हा अंदाज प्रेक्षकांना खुपच भावाला आहे त्यामुळे तो या सिजनचा विजेता व्हावा अशी अनेकांची ईच्छा आहे.