
मराठी कलाविश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्साहित असतो. नुकताच जागतिक मातृदिन साजरा करण्यात आला. यावेळी कलाकारांनी त्यांच्या आई आणि मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळाले. अशातच अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्याही मुलांनी आईला शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या. यावेळी पहिल्यांदाच सुप्रिया पाठारे यांच्या लेकीने आईसोबतचा फोटो शेअर करत मातृदिन साजरा केला. सुप्रिया पाठारे आणि मिनेश पाठारे यांना दोन अपत्ये आहेत. गेली अनेक वर्षे ते ठाण्यात वास्तव्यास आहेत.
मिहीर आणि जान्हवी अशी त्यांची दोन्ही मुलं अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत मात्र याअगोदर महाराज या हॉटेल व्यवसायामुळे तो मिडियासमोर आलेला पाहायला मिळाला. मिहीर हा शेफ असून परदेशातली नोकरी सोडून तो ठाण्यात स्वतःचा व्यवसाय चालवत आहे. महाराज या त्याच्या हॉटेलमध्ये आजवर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. तर सुप्रिया पाठारे यांची लेक जान्हवी तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. जान्हवी कधीच मिडियासमोर फारशी न आल्याने ती लाईमलाईट पासून थोडीशी दूर होती. पण इन्स्टग्रामवर ती बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असलेली पाहायला मिळते.

जेव्हा सुप्रिया पाठारे शुटिंगनिमित्त बाहेरगावी असायच्या तेव्हा मिनेश पाठारे यांनी त्यांच्या मुलांची जबाबदारी नेटाने सांभाळली. सुरुवातीला त्यांनी गलेलठ्ठ पगाराची नोकरीही केली. पण मुलांच्या जबाबदारीमुळे त्यांनी घर सांभाळणे पसंत केले. अर्थात नवऱ्याच्या याच सहकार्यामुळे सुप्रिया पाठारे बाहेर राहून काम करू लागल्या. कधीकधी शूटिंगमधून वेळ मिळेल तसा त्या महाराजला भेट देतात आणि तिथले कामकाज देखील पाहतात. त्यांच्या मुलाचं करिअर आता सेट झालं आहे. तर शिक्षणानंतर जान्हवीदेखील करिअर म्हणून कोणते क्षेत्र निवडणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल.