
कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्यातील पात्र मनात घर करून आहेत. याच मालिकेतील खलनायिका म्हणजेच बिंबावती दौलतराव निबाळकर हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सुंदरा मनामध्ये भरली मध्ये बिंबावती ही दौलतची पत्नी होती ही भूमिका अभिनेत्री प्रगल्भा कोळेकर हिने साकारली होती. प्रगल्भाने काल शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी मंगेश जोशी सोबत मोठ्या थाटात केलेले पाहायला मिळते. प्रगल्भा ही उत्कृष्ट नृत्यांगना तसेच अभिनेत्री आहे तर मंगेश जोशी हे लेखक, दिग्दर्शक तसेच निर्माता म्हणून या सृष्टीत कार्यरत आहेत. दोघांच्या या लग्नाच्या बातमीवर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

प्रगल्भा कोळेकर ही मूळची पुण्याची. पिंपरी चिंचवडच्या पी जोग स्कुलमधून आणि पुढे हुजूरपागा शाळेतून तिने शिक्षण घेतले. प्रगल्भाने एअरहोस्टेस म्हणून काही काळ नोकरी केली होती पण अभिनयाची आवड असल्याने तिने ती नोकरी सोडली. दरम्यान तिने भरतनाट्यमचे धडे गिरवले. लावणी, बेलीडान्स अशा नृत्य प्रकारात तिने प्राविण्य मिळवलं आहे. याशिवाय अभिनयाच्या ओढीने तिने ललीतकला केंद्र मध्ये प्रवेश मिळवून नाट्यशास्राचे धडे गिरवले. यातून पुढे तिला संगीत नाटकातून काम करण्याची संधी मिळाली. यदा कदाचित या नाटकातून तिने द्रौपदीची भूमिका साकारली होती. उस पार, इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, बँग बँग, हलाल, टर्निंग पॉईंट अशा चित्रपट, मालिका,शॉर्टफिल्ममधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून बिंबावतीच्या वोरोधी भूमिकेमुळे प्रगल्भाला मोठी प्रसिद्धी मिळाली. तर मंगेश जोशी याने लेथ जोशी, कारखाणीसांची वारी अशा चित्रपटांसाठी दिग्दर्शक तसेच लेखक, निर्माता म्हणून काम केले आहे. काल शुक्रवारी मंगेश आणि प्रगल्भाचा साखरपुडा आणि त्यानंतर लग्नाचा सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी मोजक्याच नातेवाईक, मित्रमंडळींना आमंत्रण दिले होते. आरती मोरे, अदिती द्रविड या सेलिब्रिटींनी प्रगल्भा आणि मंगेशचे अभिनंदन केले आहे.