सुलभा देशपांडे यांची धाकटी बहीण आणि ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन….वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमाताई साखरदांडे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे. काल गुरुवारी रात्री १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. प्रेमाताई साखरदांडे यांनी नाटक, चित्रपट, मालिकांमधून अभिनयाची छाप सोडली होती. ध्वनिमुद्रक वसंतराव कामेरकर यांच्या त्या कन्या होत. प्रेमा साखरदांडे या लहान आल्यापासूनच कलेशी निगडित होत्या. त्यांच्या बहिणी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे यांनीही अभिनय क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. घरचं संपूर्ण वातावरणच कलामय असल्याने मोठमोठ्या लोकांचे त्यांच्या घरी येणेजाणे असायचे.

यातूनच शिक्षिका आणि मुख्याध्यापिका अशा भूमिकाही त्यांनी निभावल्या होत्या. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शालेय रंगभूमी हे पुस्तक लिहिलं. बालनाट्यासाठी त्या नेहमी काम करत राहिल्या. सुलभा देशपांडे यांच्या आविष्कार आणि चंद्रशालेच्या संस्थापणात त्यांचाही मोलाचा वाटा राहिला आहे. प्रपंच मालिका, सखाराम बाईंडर, स्पेशल २६, इम्पॉसीबील मर्डर, जुली, बेट अशा नाटक, चित्रपटातून त्यांनी अभिनय केला होता.

वृद्धपकाळात त्या अभिनय क्षेत्रापासून थोड्याशा बाजूला होत्या. काल गुरुवारी त्यांना अस्वस्थ जाणवू लागले. रात्री १० च्या सुमारास प्रेमाताई साखरदांडे यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगितले जाते. त्यांच्या या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.