लहान मुलांना रंगवून अश्या प्रकारे उभं केलं जातं पैश्यासाठी हे सगळं संशयास्पद आहे व्हायरल व्हिडिओची दखल घेत सुकन्या यांनी
जानेवारी महिन्यात सोलापुर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सिद्धरामेश्वर यात्रा भरली होती. या यात्रेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात्रेत गेलेल्या एका सुजाण नागरिकाच्या एक गंभीर बाब लक्षात आली तीथल्या परिस्थितीची माहिती देताना त्या व्यक्तीने ही बाब मोबाईलमध्ये शूट केली होती. यात्रेत अवघ्या चार पाच वर्षांची मुलं शरीरावर रंग लावून अर्धनग्न अवस्थेत उभी होती. थंडीचे दिवस असल्याने त्या चिमुरड्यांना थंडी वाजत होती. व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने या मुलांची सखोल चौकशी केली पण काहीतरी काळंबेर असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब सोशल मीडियावर शेअर केली. अर्धनग्न अवस्थेत उभ्या असलेल्या या मुलांवर लक्ष देण्यासाठी जवळच त्यांच्यापेक्षा थोड्या जास्त वयाच्या मुलांना उभं करण्यात आले होते.
त्या मुलांपैकी एकीला ‘ही कुणाची मुलं आहेत’ अशी चौकशी केली. पण त्या मुलांनी उत्तर देण्याचे टाळले आणि आम्हाला त्या भैय्याने लक्ष द्यायला संगीतले एवढेच त्यांचे म्हणणे होते. शिवाय ती मुलगी नशेत असल्याचेही त्या व्यक्तीच्या लक्षात आले. ही मुलं कोणाची आहेत? याबद्दल कुणालाच काही माहिती नव्हती. यात्रेत आलेली लोकं रंगवलेल्या मुलांजवळ जाऊन फोटो काढून घेत होती, त्यांच्या जवळ असलेल्या ताटात पैसे टाकत होती पण ही मुलं अशी का उभी आहेत याची कोणीच चौकशी केली नाही. पोलीस तिथे असूनही त्यांची चौकशी करत नव्हते. प्रशासनाने या गंभीर गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे असे म्हणत त्या व्यक्तीने ही गंभीर बाब लोकांच्या निदर्शनास आणून दिली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी यावर ताबडतोब कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले आहे. यात्रेत अशा बारा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते असे म्हटले गेले. ही मुलं हरवलेल्यापैकी कोणी आहेत का याचीही चौकशी करण्यात आली होती.
दरम्यान सुकन्या कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ शेअर करताना एक काळजी व्यक्त केली आहे त्या म्हणतात की, “मला एका what’s app group वर हा video आला आणि अस्वस्थ झाले. सदर मुले ही आपणा पैकीच कोणाचीतरी बेपत्ता झालेली असु शकतात ? कुठलेच माय-बाप आपल्या मुला-मुलींना अश्या पद्धतीने पैश्यांन साठी उघड्याने नाही सोडत, हे सगळे संशयस्पद आहे..!! कोणी ह्याची दखल घेईल का?” लहान मुलांचा वापर करून अश्याप्रकारे पैसे कमवले जातात भीक मागितली जाते त्यामुळे लोकांनी भावनेच्या भरात येऊन लहान मुलांना मुळीच पैसे देऊ नये नाहीतर हे प्रमाण वाढतच राहील.