मराठी सृष्टीत सोनाली कुलकर्णी या नावाने दोन अभिनेत्री प्रसिद्ध आहेत. यामुळे कुठली सोनाली? असा प्रश्न प्रेक्षकांना पडत असतो. याबद्दल सोशल मीडियावर मोठया सोनालीने खंत देखील व्यक्त केली होती. असो पण आता मोठी सोनाली आणि छोटी सोनाली अशी त्यांची ओळख दाखवली जाते. दरम्यान या सोनालीने हिंदी सृष्टीतही नाव कमावलं आहे त्यामुळे अर्थातच ती तिच्या कामामुळे सिनिअर ठरली आहे. हीच सिनिअरीटी पाहून सोनालीने नुकतीच एक महागडी गाडी खरेदी करून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे.
वर्षाच्या अखेरीस सोनाली कुलकर्णीने मर्सिडीज बेंझ खरेदी केली आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली. मराठी इंडस्ट्रीत काही मोजकेच कलाकार आहेत ज्यांनी महागड्या गाड्या खरेदी करण्याची स्पर्धा लावली आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्नील जोशीनेही दीड कोटींहून अधिक किंमतीची गाडी खरेदी केली होती. सई ताम्हणकर, मंदार जाधव असे काही सेलिब्रिटी महागडी गाडी खरेदीसाठी ओळखले जातात. त्यात आता सोनालीने तब्बल ७८ लाख किंमतीची मर्सिडीज बेंझ जीएलसी ही गाडी खरेदी केली. ही गाडी प्रवासासाठी अतिशय आरामदायी असल्याने सोनालीने या गाडीला पसंती दर्शवली. ऑगस्ट २०२४ मध्ये भारतात ही गाडी लॉन्च झाली होती तेव्हाच ही गाडी घेण्याचा सोनालीने विचार केला होता.
ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यासाठी सोनाली दिल्लीला गेली होती. त्यानंतर परत आल्यानंतर तिने ही महागडी गाडी खरेदी केली. शाळेत असल्यापासूनच सोनाली नाटकातून काम करत असे. चेलुवी या दाक्षिणात्य चित्रपटात तिला पहिल्यांदा झळकण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर सोनालीने हिंदी सृष्टीतही स्वतःची ओळख बनवली.