सिद्धू सहज बोलून गेला की तुला कोण ओळखतं? तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात.. नवरा बायकोत छोटी छोटी भांडणं होतात पण

अभिनेता सिद्धार्थ जाधव हा मराठी तसेच हिंदी सृष्टीत नेहमीच सक्रिय असताना दिसला आहे. मुख्य भूमिकेपेक्षा त्याने सहाय्यक भूमिकेला जास्त पसंती दर्शवली आहे. एक गुणी, सगळ्यांना सांभाळून घेणारा आणि हसवणारा कलाकार अशी त्याची ओळख आहे पण मधल्या काही काळात तो घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या. पण आता त्याचा संसार सुरळीत सुरू असल्याचे म्हटले जात आहे. नुकतेच कांचन अधिकारी यांना दिलेल्या मुलाखतीत तृप्तीने नावात बदल का केला याचे कारण सांगितले आहे.

सिद्धार्थ जाधवची बायको म्हणून नाही तर आता ती तृप्ती अक्कलवार असे नाव लावते याचे कारण ती सांगताना म्हणते की “”लॉकडाउनच्या दरम्यान सिद्धू सहज बोलून गेला की तुला कोण ओळखतं? तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात… तुझी काय आयडेंटिटी आहे?? नवरा बायकोत छोटी छोटी भांडणं होतात तसंच ते छोटं भांडण होतं…पण तो जे सहज बोलला ते माझ्या मनाला खूप लागलं आणि त्यादिवशी ठरवलं की आपण स्वतःची ओळख बनवायची. मग एका मैत्रिणीला सोबत घेऊन स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. नवऱ्याकडून पैसे घेऊ शकत नव्हते कारण मला ते स्वतः करून दाखवायचं होतं. त्यामुळे जवळच्या मैत्रिणी, ओळखीच्या लोकांकडून अगदी ७ % ने मी आणि एका मैत्रिणीने ५० लाखांचं कर्ज उभं केलं. ‘स्वैरा एंटरप्राइजेस’ नावाने कंपनी सुरू केली, त्यात साड्यांचा ब्रँड सुरू केला.

या कमाईतून आज मी जवळपास ९०% कर्ज फेडलं आहे. यातूनच आता होम स्टेच्या उद्देशाने नागावमध्ये विला खरेदी केला. आता मी माझी ओळख तृप्ती सिद्धार्थ जाधव म्हणून नाही तर तृप्ती अक्कलवार म्हणून सांगते. मला सर्व महिलांना हेच सांगायचंय की तुम्हीही चार भिंतीत न राहता बाहेर पडा, स्वतःची ओळख बनवा”. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायला पाहिजे. कोणाचेही मागे पाय खेचण्यापेक्षा तिला प्रोत्साहन द्यायला पाहिजे असे त्या सांगतात.