आज २६ जुलै रोजी घरत गणपती हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रीमियरकला मराठी सृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. भूषण प्रधान, निकिता दत्ता, अजिंक्य देव, अश्विनी भावे, शुभांगी गोखले, सुषमा देशपांडे, पती तेलंग अशी भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटाला लाभली आहे. घरतांचा गणपती म्हणून घरत गणपती असे या चित्रपटाचे नाव आहे..यात कौटुंबिय, भावनिक नात्यांची सांगड घातलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी या चित्रपटात आत्याची भूमिका साकारली आहे ही भूमिका विरोधी नाही पण अधिकार गाजवणारी आहे असे त्या आपल्या भूमिकेबद्दल म्हणतात.
या चित्रपटाचे शूटिंग केरळमध्ये करण्यात आले होते. दिग्दर्शकाला जसे हवेत तसेच सिन त्याने शूट करून घेतले त्यामुळे या सगळ्यांसोबत काम करताना एक छान बॉंडिंग जुळून आलं असं त्या म्हणतात. सध्या सगळीकडेच गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. पण एकीकडे ही धामधूम सुरू असताना शुभांगी गोखले यांनी मात्र आता सार्वजनिक गणपती बंदच व्हायला हवेत असे परखडपणे मत व्यक्त केलं आहे. याबद्दल त्या म्हणतात की, ” गणपतीच्या सोहळ्याचं अवडंबर झालं आहे आणि खूप चुकीच्या गोष्टी घडत आहेत. आपण पाहतो की रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही ते करता, दहा दिवस तुम्ही त्याचं सगळं करता आणि संध्याकाळी मागे बसून दारू पिऊन पत्ते खेळता, हे तर कुणी अमान्यच करू शकत नाही.
हे काय आहे सगळं? पैसे मिळवण्या, बेकारी वगैरे आता खूप लोकांना हे आता कळालंय, तुम्ही दुसरं पण काम करू शकता.यातून तुम्ही तुमच्याच देवाचा अपमान करताय. छोट्या छोट्या गावात सुद्धा एकगाव एक गणपती करतंय. का नाही करू शकत, तुम्हाला कळत नाहीये तुम्ही काय करताय?. यामुळे सगळी एनर्जी वाया जात आहे, सगळ्या प्रकारचं प्रदूषण होत आहे. मला असं वाटतं की घरोघरी जो गणपती बसतो तो खूप सुंदर असतो. यावर सगळ्यांनी आता कुल व्हायला हवं. “