news

आम्ही दोघेही एकदम दोन टोकाच्या व्यक्ती त्यामुळे सगळेच…अशी आहे शिवानी सोनारची लव्ह स्टोरी

आयुष्याचा जोडीदार कधी कुठे आणि कसा भेटेल याची माहिती कोणालाच नसते. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री शिवानी सोनार हिने घेतला आहे. राजा राणीची गं जोडी मालिकेतून घराघरात पोहोचलेली शिवानी सोनार हिने एप्रिल महिन्यात अभिनेता अंबर गणपुळेसोबत साखरपुडा करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. कारण हे दोघे कधीच कुठे एकत्र पाहायला मिळाले नव्हते, शिवाय दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती अचानक साखरपुडा करतात तेव्हा सेलिब्रिटींनाही हा मोठा सुखद धक्काच बसला होता. तुम्ही दोघे कसे? असे प्रश्न तिच्या साखरपुड्याच्या बातमीवर पडले होते. यावर शिवानीने नुकताच खुलासा केलेला पाहायला मिळाला आहे.

shivani sonar and ambar ganpule wedding engagement photos
shivani sonar and ambar ganpule wedding engagement photos

चाहत्यांची ही प्रश्नांची उत्तरं देताना शिवानी म्हणते की, “आम्ही दोघेही एकदम दोन टोकाच्या व्यक्ती. आमचे स्वभाव एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत तरीही आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. अंबर आणि माझी कशी फारशी मैत्री नव्हती. तो काही प्रोजेक्ट करून पुण्याला असायचा तेव्हा मीही माझे प्रोजेक्ट करून पुण्याला जात असे तेव्हा आमची भेट होत असे. पण मैत्रिपलीकडे आमच्यात असे काहीच नव्हते. आमचा एक कॉमन फ्रेंड होता ज्याला आमच्या दोघांना घेऊन एक शॉर्टफिल्म बनवायची होती. या शॉर्टफिल्मच्या निमित्ताने आमची भेट होऊ लागली, आम्ही एकत्र प्रॅक्टिस करू लागलो तेव्हा आमच्यात प्रेम जुळून आले. ही गोष्ट आम्ही आमच्या घरी सांगितली तेव्हा घरच्यांनीसुद्धा काहीच विरोध न दर्शवता आमच्या लग्नाला परवानगी दिली. एप्रिल महिन्यात आम्ही साखरपुडा केला तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण आम्ही कधीच एकत्रित फोटो शेअर केलेले नव्हते. त्यामुळे हे कधी आणि कसं घडलं असे अनेक प्रश्न विचारण्यात येऊ लागले. “

Shivani Sonar and Ambar Ganpule engaged
Shivani Sonar and Ambar Ganpule engaged

शिवानी सोनार ही सध्या सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने या मालिकेत दुहेरी भूमिका साकारत आहे. छोट्या छोट्या भूमिका साकारत असताना शिवानी राजा राणीची गं जोडी मालिकेतून प्रमुख भूमिकेत झळकली. सिंधुताई माझी माई, तू भेटशी नव्याने अशा मालिकांमधील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले. तर अंबर गणपुळे हा देखील एक उत्तम अभिनेता आहे. लोकमान्य, रंग माझा वेगळा, देह संदेह , तू फुलराणी अशा प्रोजेक्टमधून काम करताना दिसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button