news

रंग माझा वेगळा मालिकेतील आणखी एक कलाकार होणार विवाहबद्ध… मित्र मैत्रिणींनी बॅचलर पार्टीचे फोटो होताहेत वायरल

मराठी सृष्टीत सेलिब्रिटींच्या लग्नाची धामधूम सुरू झालेली आहे. आज सारं काही तिच्यासाठी मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर सोशल मीडिया स्टार सोनाली गुरव सोबत लग्न बंधनात अडकणार आहे. तर शिवा मालिकेतील अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि फॅशन डिझायनर श्रेया दफळापूरकर सोबत ९ डिसेंबर रोजी लग्न करणार आहे. याच जोडीला मराठी सृष्टीतील आणखी एक सेलिब्रिटी कपल विवाहबद्ध होणार आहे. नुकतेच या सेलिब्रिटीकपलने ब्राईड टू बी आणि ग्रुम टू बी म्हणत बॅचलर पार्टी साजरी केली. हे सेलिब्रिटी कपल म्हणजेच अभिनेता अंबर गणपुले आणि अभिनेत्री शिवानी सोनार आहेत.

shivani sonar and ambar ganpule wedding bachelor party
shivani sonar and ambar ganpule wedding bachelor party

अभिनेत्री शिवानी सोनार हिने राजा राणी ची गं जोडी या मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. तर अंबर गणपुले हा रंग माझा वेगळा या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला होता. यानंतर हे दोघे अनेक प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळाले. दोघांनी एप्रिल महिन्यात साखरपुडा करून सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. हे दोघे कधीच एकत्र पाहायला मिळाले नव्हते त्यामुळे या साखरपुड्यामुळे सगळेच जण अवाक झाले होते. खरं तर एका प्रोजेक्ट निमित्ताने दोघांचीही पुण्यात भेट झाली होती. तेव्हा त्यांच्यात मैत्री वाढत गेली. एकमेकांना प्रपोज न करताच दोघेही प्रेमात पडले. एप्रिल महिन्यात साखरपुडा केल्यानंतर आता डिसेंबरच्या सुरुवातीलाच हे दोघेही लग्नबांधनात अडकताना दिसणार आहेत.

actress shivani sonar and actor ambar ganpule wedding bachelor party
actress shivani sonar and actor ambar ganpule wedding bachelor party

काल रविवारी या दोघांच्या मित्र मैत्रिणींनी बॅचलर पार्टीचे खास आयोजन केले होते. ब्राईड टू बी आणि ग्रुम टू बी म्हणत या दोघांनीही लवकरच पार पडणाऱ्या लग्नाची बातमी जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अनेक मराठी सेलिब्रिटी विवाहबद्ध होताना दिसणार आहेत. महत्वाचं म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्याही लग्नाची तयारी सुरू झालेली आहे. डिसेंबर महिन्यात रंग माझा वेगळा मालिकेतील हे दोन्ही कलाकार विवाहबद्ध होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button