news

आजोबांनी एटीएम मधून ५०० रुपये काढायला सांगितले मी आधी माझ्यासाठी ३०० काढले मग … संकर्षणच्या फसलेल्या चोरीचा भन्नाट किस्सा

गेल्या काही वर्षात संकर्षण कऱ्हाडेने त्याचा एक मोठा फॅनफॉलोअर्स जमवला आहे. नाटक, कविता, चित्रपट अशा माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. परभणीच्या या हरहुन्नरी कलाकाराने याच कारणामुळे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. संकर्षण त्याच्या मिश्किल स्वभावसाठीही ओळखला जातो. लहानपणी अतिशय खोडकर असणाऱ्या संकर्षणने त्याचा एक चोरीचा किस्सा पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत शेअर केला आहे. त्याची ही चोरी पकडली गेल्याचे लक्षात येताच मात्र उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. चोरीचा आणि ३०० रुपयेच्या घामाचा हा किस्सा सांगताना संकर्षण म्हणतो की, “माझे वडील बँकेत कामाला होते. त्यांच्यासमोर कुठल्याही अकाउंट असलेल्या माणसाची कुंडली असते. आजोबांनी मला एटीएम मधून ५०० रुपये काढून आणायला सांगितले.

sankarshan karhade family photo
sankarshan karhade family photo

मी काय केलं आधी एटीएम मधून ३०० रुपये काढले त्याची ती पावती फाडून टाकायचो, ३०० रुपये खिशात ठेवायचो आणि परत ५०० रुपये काढायचो. त्याची पावती जपून ठेवायची आणि ती आजोबांना द्यायचो, हे घ्या आजोबा तुमचे ५०० रुपये . आजोबा त्यावर विश्वास ठेवायचे. बाबा संध्याकाळी बँकेतून घरी आले आणि आजोबांना विचारले की बाबा आज ८०० रुपये कशाला काढले हो? . मला जो घाम आला होता ना ३०० रुपयांचा त्यानंतर शरीरात सगळीच प्रक्रिया झाली. आजोबांनाही त्यावर प्रश्न पडला की मी तर ५०० च रुपये काढायला सांगितले. पण ते लगेचच स्वतःला सावरत , हो बरोबर ते ८०० रुपये काढलेत मी , जरा काम होतं. बाबा जेवायला आत गेले की माझे आजोबा मला एक शिवी देत इकडे ये रे म्हणून बोलावून घ्यायचे. आणि म्हणायचे की, ‘आपण चोरी करताना आपला बाप बँकेत आहे ह्याचं तरी भान ठेवा.”

sankarshan karhade with father
sankarshan karhade with father

संकर्षण कऱ्हाडे हा लहानपणी किती अतरंगी होता हे या उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेलच. याच मुलाखतीत त्याने सुलभा देशपांडे यांच्या भेटीचाही किस्सा सांगितला आहे. कलाक्षेत्राशी कुठलाही संबंध नसताना परभणीत आलेल्या कलाकारांना आपल्या घरी जेवायला बोलवायचं हे संकर्षणच्या वडिलांचं आवडतं काम होतं. कुठल्याही आयोजकांकडे कलाकारांच्या जेवणाची व्यवस्था आमच्याकडे करा अशी विनंती करायचे तेव्हा सुलभा देशपांडे त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी सकर्षणला लहान असताना नाटकासाठी एक पारितोषिक मिळाले होते. त्याच्या वडिलांनी त्याला पुढे करत सुलभा ताईंना बक्षीस मिळवल्याचे संगीतले तेव्हा त्या मी ह्या मुलाशी नाही बोलणार म्हणत तोंड फिरवू लागल्या. संकर्षण रडवेला झालेला पाहून पुन्हा त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि आम्हाला एवढ्या लहान वयात कुठलीच बक्षिसं मिळाली नाहीत असे म्हणत त्याचे कौतुक केले. त्यांची ही आठवण मी आयुष्यभर जपतोय असे तो सांगतो. आणि कोणता मुलगा माझ्या नाटकाला आला तर त्याच्यासोबत कैतुकाने फोटो काढून घेतो जेणेकरून ही छोटी छोटी मुलं भविष्यात कोणी मोठ्या व्यक्ती बनल्या तर त्यांना माझी ही गोड आठवण काढता यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button