news

कलाकारांनी साजरं केलं केळवण…साखरपुड्यानंतर जवळपास ४ महिन्यांनी चढणार बोहल्यावर

कलाकारांची लग्न ही नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात. लवकरच मराठी सृष्टीत एका प्रसिद्ध कलाकाराची लगीनघाई पाहायला मिळणार आहे. कारण नुकताच त्यांच्या केळवणाचा थाट साजरा करण्यात आलेला होता. अभिनेत्री क्षिती आणि हेमंत ढोमे, चैत्राली आणि लोकेश गुप्ते, नेहा आणि चिन्मय मांडलेकर यांनी हे केळवण आयोजित केले होते. तर हा सगळा थाट पाहून लवकरच विवाहबद्ध होत असलेले हे दांपत्य भारावून गेलेले पाहायला मिळाले आहे. तर हा सगळा केळवणाचा बेत दिग्दर्शक समीर विध्वंस याच्यासाठी बनवण्यात आला होता.

Sameer Sanjay Vidwans  wedding kelvan photos
Sameer Sanjay Vidwans wedding kelvan photos

फेब्रुवारी महिन्यात दिग्दर्शक समीर विध्वंस याने जुईली सोनलकर सोबत साखरपुडा केला होता. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला हा सोहळा आयोजित करण्यात आला तेव्हा मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. त्यानंतर आता जवळपास ४ महिन्यांनी हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. समीर विध्वंस हे मराठी सृष्टीतील एक उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. आनंदी गोपाळ, डबल सीट, धुरळा, वाय झेड, क्लासमेट, लग्न पाहावं करून यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर सत्य प्रेम की कथा मधून ते हिंदी चित्रपट सृष्टीतही नशीब आजमावताना दिसले. समीर जिच्याशी विवाहबद्ध होत आहे ती जुईली सोनलकर याच इंडस्ट्रीशी निगडित काम करताना दिसते.

Sameer Sanjay Vidwans  and juilee sonalkar wedding kelvan
Sameer Sanjay Vidwans and juilee sonalkar wedding kelvan

फार वर्षांपासून या दोघांची छान मैत्री आहे. पण आता लवकरच त्यांच्यातील मैत्रीचे नात्यात रुपांतर होणार आहे. येत्या काही दिवसात समीर आणि जुईलीच्या लग्नाचा बार उडणार आहे. त्यासाठी त्यांच्या जवळच्या मित्रांनी त्यांचे केळवण करण्याचा घाट घातलेला पाहायला मिळाला. सुंदर सजावट आणि केळवणाचा हा बेत पाहून समीर आणि जुईलीने या सगळ्यांचे आभार मानले आहेत. समीर आणि जुईलीला आमच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button