अभिनेत्री सई ताम्हणकर नवनवीन प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्याच वर्षी तिने आलिशान फ्लॅट घेतला होता. त्यामुळे तिची यशाची गाडी सुसाट पळताना दिसत आहे. पण या वाटेवर सईला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. सई ताम्हणकर हिने अमित गोसावी सोबत लग्न केले होते. पण तिचे हे लग्न फार काळ टीकले नाही. अवघ्या काही वर्षातच तिने तिच्या पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिला होता. मधल्या काळात सई तिच्या करिअरवर लक्ष देताना दिसली तेव्हा अनिश जोग तिच्या आयुष्यात प्रेमाची चाहूल घेऊन आला.
अनिशसोबत नात्यात असल्याची जाहीर कबुली तिने सोशल मीडियावर दिलेली होती. अनेकदा हे दोघे एकत्रित ट्रिप एन्जॉय करतानाही पहायला मिळाले. अनिश हा निर्माता आहे त्यामुळे सई त्याच्यासोबत खुश होती. हे दोघे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या समीर विद्वान्सच्या लग्नाला एकत्रित हजर राहिले होते. पण आता सईने एक पोस्ट करत मी सिंगल असल्याचे जाहीर केले आहे. तिच्या या पोस्टमुळे सईचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. सईने तिच्या इंस्टा स्टोरीवर “मी स्वत:च्या चॉईसने सिंगल आहे. ही माझी निवड नाही. पण आता ही माझी निवड आहे.” असे म्हणत सईने ही एक “ट्रु स्टोरी आहे” असे म्हटले आहे. त्यामुळे सई ताम्हणकर आता सिंगल असल्याचे जाहीर करताना दिसत आहे.
सईचं ब्रेकअप होण्यामागचं कारण काय हे अजून स्पष्ट झालं नाही पण याबद्दल ती तिच्या भावना नक्कीच व्यक्त करेल. सध्या सई ताम्हणकर सोनी मराठीच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये परीक्षक म्हणून भूमिका बजावत आहे. दिल अभि भरा नहीं ही हिंदी शॉर्टफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यासोबतच सई हिंदी मराठी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळत आहे.