श्रियाच्या जन्मानंतर सुप्रियाला हवा होता मुलगा ती गरोदर राहिली पण ५ व्या महिन्यात….२ अपत्य गमवाल्यांनंतर आम्ही
सचिन पिळगावकर अभिनित आणि दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा हा चित्रपट तुफान गाजला. याच लोकप्रियतेनंतर सचिन यांनी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. ज्यात सचिन, सुप्रियासह स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली असगर, अशोक सराफ, निवेदिता सराफ आणि आणखी बरेचसे जाणते कलाकार या चित्रपटाला साथ देणार आहेत. सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया या चित्रपटात का नाही अशी एक चर्चा पाहायला मिळाली. पण श्रिया सध्या हिंदी सृष्टीत नाव कमवत आहे त्यामुळे तूर्तास तरी ती या चित्रपटात श्रिया नसणार हे सांगीतले जात आहे. श्रिया नंतर सुप्रिया पिळगावकर यांना मुलगा हवा होता. पण या प्रयत्नात त्यांना दोन अपत्ये गमवावी लागली होती. हा किस्सा सचिनजींनी त्यांच्या ‘हाच माझा मार्ग’ या पुस्तकात सांगीतला आहे.
ते म्हणतात की,” श्रियानंतर सुप्रियाला मुलगा हवा होता. तिने माझं माझ्या आईवरचं प्रेम पाहिलं होतं त्यामुळे आपल्या आईवर प्रेम करणारा एखादा मुलगा आपल्यालाही व्हावा अशी तिची ईच्छा होती. पण देवाच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. १९९२ मध्ये सुप्रिया गरोदर राहिली. यादरम्यान मी एका प्रोजेक्टच्या निमित्ताने बाहेर होतो. त्याचदरम्यान सुप्रिया पाच महिन्यांची गरोदर असताना तिचं मिसकॅरेज झालं. त्यानंतर १९९६ मध्ये ती पुन्हा गरोदर राहिली पण याहीवेळेला ५ व्या महिन्यातच आम्ही ते मूल मिसकॅरेंज मुळे गमावलं. मला तिच्या वेदना जाणवत होत्या. जेव्हा ते अर्भक घेऊन मी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत घेऊ जात होतो तेव्हा मी खूप भावुक झालो होतो. यासगळ्या गोष्टी माझ्याच बाबतीत का घडतात असा विचार मनात घोळत राहिला. पण नियतीपुढे काहीही चालत नाही म्हणतात, मग मीच मुलाचा विचार डोक्यातून कायमचा काढून टाकला. पण त्यानंतर अली असगर आणि स्वप्नील जोशी हे दोघेजण आमच्या आयुष्यात आले आणि आपलेसे करून गेले.
अलीने एक दोन तीन मध्ये विनोदी भूमिकेसाठी काम केलं तर हद कर दी मध्ये स्वप्नील जोशी आला. हे दोघे आमच्या आयुष्यात आले आणि आम्ही त्यांना आमची मुलं म्हणू लागलो. श्रिया सोबत त्या दोघांचं नातं खूप घट्ट झालेलं आहे. अली आईवर गेलाय तर स्वप्नील माझ्यावर गेलाय. आमच्या या तिन्ही मुलांच्या नावाने मी ‘थ्री चिअर्स’ ही निर्मिती संस्था सुरू केली.” या निर्मिती संस्थेतूनच नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट बनवला जात आहे. स्वप्नील जोशी आणि अली असगर या त्यांच्या दोन्ही मुलांना त्या या चित्रपटात महत्वाची भूमिका देऊ केली आहे. त्यामुळे सचिनजींसाठी हा प्रोजेक्ट खूपच महत्वाचा मानला जात आहे.