news

रकुल प्रीत सोबत जॅकी भगनानी विवाहबद्ध….मेहुण्याच्या लग्नात रितेश देशमुखची सहकुटुंब हजेरी

२१ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध बॉलीवूड स्टार रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी गोव्यात मोठ्या थाटामाटात लग्न केलेले पाहायला मिळाले. त्यांच्या लग्नाचे खास फोटो चाहत्यांसमोर आले आहेत. रकुल आणि जॅकीच्या लग्नाची लगबग १९ फेब्रुवारी पासूनच सुरू होती. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी रकुल जॅकीच्या संगीत सोहळ्यात मोठी धमाल केली होती. अनेक हिंदी गाण्यावर या सेलिब्रिटींनी ठेका धरलेला पाहायला मिळाला. या दोघांचे लग्न अटेंड करता यावे म्हणून बॉलिवूड सृष्टी आदल्या दिवशीच गोव्यात दाखल झाली होती. रितेश देशमुख त्याच्या आईसोबत या लग्नाला हजर राहिला होता. सोशल मीडियावर या दोघांवर सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा पाऊस पडत आहे. याशिवाय शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, मीरा राजपूत, वरून धवन, शाहिद कपूर, नताशा दलाल या सर्वांनी हे लग्न अटेंड केलेलं पाहायला मिळालं.

Rakulpreet and Jackky bhagnani wedding
Rakulpreet and Jackky bhagnani wedding

जॅकी भगनानी हा रितेश देशमुखचा मेहुणा लागतो. रितेशचा भाऊ धीरज देशमुख याची पत्नी दिपशिखा देशमुख ही जॅकी भगनानीची सख्खी बहीण आहे. बॉलीवूड चित्रपट निर्माते वाशु भागनानी हे जॅकी आणि दिपशिखाचे वडील आहेत. जॅकी भगनानी हा बॉलिवूड सृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण करताना दिसला तर दिपशिखा ही देखील वडिलांच्या निर्मिती संस्थेत काम करते. बडे मियाँ छोटे मियाँ या आगामी चित्रपटासाठी तिने काम केलेले आहे. २०१२ मध्ये दिपशिखा आणि धीरज देशमुख यांनी लग्नगाठ बांधली होती. मेहुण्याच्या म्हणजेच जॅकीच्या लग्नात जाता यावे म्हणून रितेश गोव्याला जाण्यासाठी अगोदरच तयारीत होता. दोन दिवसांपूर्वी तो आईसह मुंबईच्या एअरपोर्टवर स्पॉट झाला होता.

Rakulpreet and Jackky wedding
Rakulpreet and Jackky wedding

रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघे लग्न कधी करणार याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता होती. काल २१ फेब्रुवारी रोजी गोव्यात या दोघांचा लग्नसोहळा शाही थाटात पार पडला. लग्नात त्यांनी फिकट गुलाबी रंगाच्या थिमला प्राधान्य दिले होते. या लग्नाला रितेश देशमुखच्या कुटुंबियाने हजेरी लावलेली पाहायला मिळाली. या लग्नावेळी जेनेलिया, रितेश आणि रितेशची आई वैशाली देशमुख ह्यांनी हजेरी लावली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button