
सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूपच व्हायरल होत आहे. या फोटोवर राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रात एकच चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापुरकरांनी तर या फोटोवर प्रश्नांचा पाऊसच पाडला आहे. सैराट चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि कृष्णा महाडिक यांचा हा फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हे दोघे एकत्र कसे? ते लग्न तर करत नाहीत ना? असे अनेक प्रश या फोटोवर विचारले जाऊ लागले आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या समोर काढलेला हा फोटो याचमुळे चर्चेत आला आहे. आता रिंकू राजगुरू तर सगळ्यांना परिचयाची आहेच पण कृष्णा महाडिक हे देखील प्रसिद्ध व्यक्ती आहेत.

कृष्णा महाडिक हा कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडीक यांचा मुलगा आहे. कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचे मोठे नाव आहे. कृष्णा हा त्यांचा धाकटा मुलगा आहे. कृष्णा महाडिक सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात, त्यांचा स्वतःचा युट्युब चॅनल देखिल आहे. या चॅनलवर ते घरातल्या, कुटुंबातल्या बऱ्याच गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सोशल मीडियावरच्या त्यांच्या व्हिडिओला लाखोंचे व्युव्ज मिळतात. त्यामुळे कृष्णा महाडिक यांना महाराष्ट्राबाहेरही ओळख मिळाली आहे.

दरम्यान अभिनेत्री रिंकू राजगुरू काल रविवारी ९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या ‘राजर्षी शाहू महोत्सवात’ हजेरी लावताना दिसली होती. योगायोग असा झाक की कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनावेळी या दोघांची भेट घडून आली. कृष्णा महाडिक यांनी रिंकूसोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करताच या चर्चेला आता उधाण आलं आहे. पण या चर्चेत काहीच तथ्य नसल्याचं बोललं जात आहे. केवळ एकत्र फोटोमुळे ही लग्नाची चर्चा रंगवली जात आहे.