२००७ साली रमेश भाटकर यांच्यासह अन्य ४ जणांवर गुन्हा दाखल झाला होता….बलात्काराच्या प्रकरणी पत्नीचा खुलासा
रमेश भाटकर यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला होता. मृत्यूपश्चातही त्यांच्या मैत्रीचे किस्से इंडस्ट्रीतील लोकांकडून ऐकायला मिळतात. पण २००७ सालच्या एका घटनेने स्वतः रमेश भाटकर घाबरून गेले होते. रमेश भाटकर, दिग्दर्शक रवी नायडू यांच्यासह अन्य ४ जणांवर एका १७ वर्षांच्या तरुणीने बलात्काराचा आरोप लावला होता. तेव्हा रमेश भाटकर यांना आत्महत्याच करावी का? असा प्रश्न पडला होता. खरं तर ही घटना घडली तेव्हा सगळ्यात अगोदर ही बातमी त्यांची पत्नी मृदुला भाटकर यांना कळली. त्या काळी मृदुला या न्यायाधिश होत्या.
या घटनेबद्दल त्या संगतात की, “रमेश त्यावेळी शूटिंगला गेला होता. तेव्हा मी त्याला फोन केला की तू परत ये. तो म्हणाला की कशासाठी?. रमेश खूप जॉली, आनंदी आणि इतरांनाही आनंद देणारा होता. त्याला मी सांगितलं की असं असं झालंय….तेव्हा तो घाबरून म्हणाला की, ‘अरे बापरे, आता मी काय करू?..मग मी आता आत्महत्या करू की काय?’…त्याला हे काय होतंय ते अजिबातच कळत नव्हतं. तेव्हा मी त्याला अगोदर घरी यायला सांगितलं. मी बायको म्हणून जरी असले तरी एक न्यायाधीश म्हणून मला ते विचारावं वाटलं की ‘खरं काय ते सांग?’. मी हा प्रश्न विचारला तेव्हा त्याने माझ्या डोळ्यात बघून सांगितलं की ‘मृदुला तू प्रश्न विचारतेस म्हणून मी तुला सांगतोय की हे सगळं खोटं आहे.
माझ्याकडून असं काहीही झालेलं नाही’. मृदुला भाटकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या घटनेबद्दल खुलासा केला आहे. त्यावेळी एका पत्रकाराने छापलं होतं की रमेश भाटकर यांनी त्या तरुणीचे सेमी नग्न फोटो काढले आहेत आणि ते मुंबईभर वाटले आहेत अशी एक बातमी व्हायरल करण्यात आली होती. या गोष्टी नंतर घडून आल्याचेही त्या सांगताना दिसतात. पण २०१० मध्ये रमेश भाटकर यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. २०१९ मध्ये रमेश भाटकर यांनी या जगाचा निरोप घेतला.