
बऱ्याचदा गुगलवर दिलेली माहिती ही खरी नसते. कलाकारांच्या बाबतीत तर अशा गोष्टी वारंवार समोर आलेल्या पाहायला मिळतात. चुकीची माहिती किंवा चुकीचे फोटो लावल्याने नेटकऱ्यांची यामुळे दिशाभूल होऊ शकते. राम कपूर हा हिंदी मालिका, चित्रपट अभिनेता. गेली अनेक वर्षे तो या इंडस्ट्रीत काम करतो आहे पण त्याच्याही बाबतीत हे घडावं याचं त्यालाच आश्चर्य वाटतं आहे.
गुगलची चूक लक्षात आणून देत त्याने एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. “तो राम कपूर नाहीए!…तो माझ्या इंडस्ट्रीतील माझा एक चांगला मित्र संदीप सिकंद आहे. ( माफ कर संदीप, मला खरंच कल्पना नाही की तू यात कसा ओढला गेला) . ” असे म्हणत राम कपूर यांनी गुगलची ही चूक लक्षात आणून दिली आहे. पण या पोस्टमुळे गौतमी गाडगीळ कपूर मात्र हसूनहसून लोटपोट झाली आहे.

संदीप सिकंद यांच्याही ही गोष्ट अगोदरच लक्षात आली होती आणि त्याने ही बाब गौतमीच्या निदर्शनास आणून दिली होती. पण ‘राम कपूर यांनी जेव्हापासून वजन घटवलंय तेव्हापासून गुगलही कन्फ्युज असणार आहे की नक्की राम कपूर कोण’ अशी मजेशीर प्रतिक्रिया त्याला चाहत्यांकडून मिळत आहे.