news

शेवटी मराठी मुलगीच जिंकणार…सासूबाई जरा चांगलं वागा मुलगा आणि सुनेच्या भांडणात तेल ओतू नका मराठी अभिनेत्रीचा सल्ला

हिंदी बिग बॉसचा १७ वा सिजन अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन यांच्या भांडणामुळे चांगलाच गाजला आहे. या दोघांमध्ये अनेकदा टोकाची भांडणं देखील झाली. विकी अनेकदा अंकीताला अपमानास्पद वागणूक देताना दिसला. त्याच बाजूला विकीच्या आईनेही अंकितावरच निशाणा साधत तिला धारेवर धरले. तू विकीला लाथ मारतेस, चप्पलेने मारतेस असं म्हणत त्यांनी अंकिताला गप्प केले होते. यावरून बिग बॉसच्या प्रेक्षकांनी अंकीताच्या सासूला ललिता पवार यांची उपमा दिली होती. अंकिताची आई जेव्हा बिग बॉसच्या घरात दाखल झाली तेव्हा अंकिता त्यांच्या जवळ येऊन रडली होती. पण तू खूप चांगलं खेळतीये अशी कौतुकाची थाप त्यांनी आपल्या लेकीला दिली होती.

ankita lokhande sasuma
ankita lokhande sasuma

अंकिताची आई आणि सासू दोघीही बिग बॉसच्या शोमध्ये दाखल झाल्या होत्या तेव्हा अंकिताच्या सासूने सगळ्यांनाच गप्प केले होते. त्यामुळे अंकिताची सासू तिच्या विरोधात बोलतेय अशी प्रतिमा त्यांच्याबाबत तयार झाली आहे. राखी सावंतनेही अंकीताची बाजू घेत तिच्या सासूला चांगलं वागण्याचा सल्ला दिला आहे. राखीने एक व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, “सांस भी कभी बहु थी..नवरा बायकोमध्ये तुम्ही का नाक खुपसताय, तुमचा मुलगा विकीने जर अंकिता सोबत लग्न केले आहे तर ते त्यांची आपापसातली भांडणं सोडवू शकतात, तुम्ही त्यांच्या भांडणात पडायची गरज नाही सासूबाई. जरा शांत बसायला शिका . असंही अंकिता बिग बॉसच्या १७ व्या सिजनची ट्रॉफी जिंकणारच आहे. तीच ही ट्रॉफी जिंकणार ही माझी भविष्यवाणी आहे. आमची मराठी मुलगीच हा शो जिंकणार आहे, तेव्हा तुम्ही माझी सून माझी सून म्हणत तिचं कौतुक करायला पुढे येणार.

ankta lokhande family and rakhi sawant
ankta lokhande family and rakhi sawant

मग आताच का आगीत तेल ओतण्याचे काम करता. मुलगा आणि सुनेच्या भांडणात तेल ओतू नका. आमच्याही घरात खूप भांडणं होतात पण माझी आई कधीच काही बोलली नाही. सुनेचा मान राखा तरच तुमच्या मुलींचाही तिच्या सासरच्या लोकांसमोर सन्मान वाढेल. अंकिताला मी बहीण मानते तुम्हाला आठवत असेल तर मी तुमच्या घरी तुम्हाला भेटले होते. त्यावेळी तुम्ही मला देवी सारख्या वाटल्या होत्या. अचानक अशा कशा वागायला लागल्या तुम्ही?. कैकेई बनू नका , तर त्यांचा संसार सावरायला मदत करा.” असे म्हणत राखी सावंतने अंकिताच्या सासुलाच खडेबोल सुनावले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button