news

हि अभिनेत्री आहे अक्षयची पत्नी… एकाच मालिकेत काम करत असताना झालं होत प्रेम

सध्या झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत आकाश आणि वसुंधराच्या जोडीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळू लागली आहे. लग्नानंतर आता या दोघांमध्ये हळूहळू प्रेमाचे सूर जुळताना दिसत आहेत. अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे प्रथमच या मलिकेतून एकत्रित काम करत आहेत. खरं तर अक्षय म्हात्रे बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठी मालिकेकडे वळला आहे. कारण या मालिकेअगोदर तो हिंदी मालिका गाजवताना दिसला आहे. पीया अलबेला, ये दिल मांगे मोअर, घर एक मंदिर, इंडिया वाली माँ या मालिकेत अक्षयने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हिंदी मालिकेत जाण्याअगोदर तो ‘सावर रे’ या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला होता.

actor akshay mhatre family photo
actor akshay mhatre family photo

ऋजुता देशमुख सोबत त्याने या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर अक्षय काही मराठी प्रोजेक्टमध्ये झळकला होता. त्यानंतर तो हिंदी सृष्टीत नशीब आजमावण्यासाठी गेला. तिथे गेल्यावर अक्षयला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली. २०१९ मध्ये तो फोमो या मराठी मालिकेत दिसला होता. पण आता अक्षय पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतून मराठी प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. अक्षय म्हात्रेच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर काहीच दिवसांपूर्वी त्याने हिंदी मालिका अभिनेत्री सोबत लग्न केले होते. लग्नानंतरची त्यांची ही पहिलीच वाटपौणिमा असल्याने अक्षयच्या पत्नीने महाराष्ट्रीयन पद्धतीने ही वटपौर्णिमा साजरी केलेली पाहायला मिळाली. २१ डिसेंबर २०२३ रोजी अक्षय म्हात्रेने अभिनेत्री श्रेनू पारीख हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.

akshay mhatre wife shrenu parikh wedding photos
akshay mhatre wife shrenu parikh wedding photos

जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत श्रेनूच्या मूळ गावी म्हणजेच वडोदरा येथे त्यांचे हे लग्न थाटात पार पडले होते. ‘घर एक मंदिर’ या मालिकेमुळे या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. श्रेनू ही अक्षय पेक्षा तीन वर्षाने मोठी असल्याचे सांगितले जाते. पण प्रेमात वय पाहिलं जात नाही असं म्हणतात तेच अक्षयच्या बाबतीत घडलं अस म्हणायल हरकत नाही. श्रेनू ही उत्तम अभिनेत्री असून मैत्री, घर एक मंदिर, गुलाल, इस प्यार को क्या नाम दु, ससुराल सिमर का, सर्वगुण संपन्न अशा लोकप्रिय मालिकेतून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button