news

प्रसाद अमृताच्या लग्नात सेलिब्रिटींची जमली मांदियाळी…लग्नाचे फोटो होत आहेत व्हायरल

आज १८ नोव्हेंबर रोजी प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांचा विवाहसोहळा थाटात पार पडला. गेल्या चार दिवसांपासून प्रसाद अमृताच्या लग्नाच्या अगोदरच्या विधींना सुरुवात झाली होती. ग्रहमख पूजन , मेहेंदी त्यानंतर संगीत सोहळा आणि हळदीचा सोहळा असा पारंपरिक पद्धतीने त्यांचा हा विवाहसोहळा सर्वार्थाने गाजला. काल प्रसाद अमृताच्या हळदीच्या सोहळ्याला मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर आज प्रार्थना बेहरेसह नम्रता संभेराव, शाल्मली तोळे, ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, रश्मी अनपट, आशुतोष गोखले या सेलिब्रिटींनी आवर्जून उपस्थिती लावली होती. प्रसाद अमृताच्या लग्नाला जणू सेलिब्रिटींची मांदियाळीच तिथे जमली होती.

prasad jawade and amruta deshmukh wedding photos
prasad jawade and amruta deshmukh wedding photos

त्यामुळे हे लग्न सेलिब्रिटी विश्वात देखील खूप गाजलेलं पाहायला मिळालं. प्रसाद अमृताने त्यांच्या लग्नात चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते. लाल रंगाच्या घागरामध्ये अमृता खूपच सुरेख दिसत होती तर प्रसादने देखील पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. सप्तपदीच्या विधीवेळी अमृताने राणी कलरचा बनारसी शालू नेसला होता तर प्रसादने पिवळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता परिधान केलेला होता. लग्नातील त्यांचा हा लूक विशेष लक्षवेधी ठरलेला पाहायला मिळाला. जुलै महिन्यात प्रसाद आणि अमृताने अगदी साध्या पद्धतीने साखरपुडा केला होता. त्यामुळे आमचे लग्न मोठे असणार असे त्यांनी अगोदरच जाहीर केले होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्या केळवणाचे सोहळे साजरे करण्यात येत होते. शेवटचं केळवण त्यांनी प्रसादच्या काका काकूंच्या घरी केले होते. प्रसाद आणि अमृताच्या लग्नाची पत्रिका देखील विशेष होती. त्यांच्या लग्नाची ही पत्रिका सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल झाली होती.

बिग बॉसच्या घरात जुळलेले त्यांचे हे प्रेम आज प्रत्यक्षात नात्याच्या बंधनात अडकले आहे. हे दोघे खरोखरच लग्न करणार का? यावर अनेकांना प्रश्न पडला होता. कारण बिग बॉसच्या घरात जुळलेले नाते बाहेर पडल्यानंतर वेगळं होतं हे अगोदरच्या अनुभवावरून सगळ्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे हे लग्न प्रत्यक्षात झाल्याचे पाहून सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. प्रसाद आणि अमृताला आयुष्याच्या या नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button