प्रार्थना बेहरेच्या अलिबागच्या आलिशान नव्या घराची झलक… समुद्र किनारा घरात घोडे कुत्रे आणि गायी असे बरेचसे पाळीव प्राणी
प्रार्थना बेहरे सध्या मराठी इंडस्ट्रीत एक आघाडीची नायिका म्हणून लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. पवित्र रिश्ता ही तिने अभिनित केलेली पहिली हिंदी मालिका होती. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर प्रार्थना मीडियामाध्यमातून काम करत होती. पवित्र रीश्ता मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली प्रार्थना बेहरे पुढे जाऊन मराठी इन्डस्ट्रीत स्थिरस्थावर झालेली पाहायला मिळते. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेनंतर प्रार्थना लवकरच एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आंबट शौकीन’ असं तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाचे शूटिंग झाले असून आता तो चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. मात्र हा चित्रपट येण्याअगोदरच प्रथनाने मुंबई सोडून दुसरीकडे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रार्थना सध्या अलिबागकर झाली आहे. अलिबागला तिने ऐसपैस घर बांधलेलं आहे आणि आता इथेच कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा तिचा विचार आहे. खरं तर मुंबई हे कामाचं ठिकाण त्यामुळे तिथेच काम असल्यामुळे तिला मुंबई सोडणं सुरुवातीला थोडंस जड गेलं. पण आता कायमस्वरूपी ती अलिबागला राहणार असे तिने म्हटले आहे. कारण इथं राहणं तिला आता सोपं वाटू लागलं आहे. घरापासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर मांडवा आहे जिथे बोट्स आणि रोरो मिळतात. रोरोमध्ये कार टाकली की ४० मिनिटांत तुम्ही मुंबईला पोहोचता त्यामुळे साधारण मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये तुमचा एक तास तरी जातोच आणि इथून मला मुंबईला जायला एक तास लागणार आहे हे ती अधोरेखित करते . घरासमोर समुद्र असावा अशी प्रार्थनाची ईच्छा तिन्ही घरांनी पूर्ण केली आहे. जुहूला घरासमोरच समुद्र होता तर याअगोदर ती पवईमध्ये राहायला होती तिथेही तिच्या घरासमोर समुद्र होता आणि आता अलिबागला देखील अवघ्या ५ मिनिटांच्या पावलांवर समुद्र आहे त्यामुळे इथल्या वातावरणात प्रार्थना छान रुळली आहे. हे घर म्हणजे माझं सर्वस्व आहे असे ती म्हणते.
हे घर सजवण्यासाठी अभिषेकचीही तिला मदत मिळाली आहे. प्रार्थनाच्या या नवीन घरात घोडे, कुत्रे आणि गायी असे बरेचसे पाळीव प्राणी आहेत. गेले दोन तीन वर्षे ते अलीबागच्या घरासाठी काम करत होते. प्रार्थना बऱ्याचदा अभिषेक सोबत तिच्या या नवीन घराच्या कामानिमित्त अलिबागला जात होती. पण आता हे घर तयार झालं असून इथेच स्थायिक होण्याचा निर्णय तिने घेतलेला आहे. तिच्या या नवीन घराला तिने पांढऱ्या रंगाची थीम वापरली आहे. घरासमोरच छोटासा गार्डन एरिया आहे. मुख्य दाराजवळ छानशी नेम प्लेट तिने सजवून घेतली आहे. प्रशस्त अशा खोल्यांमध्ये मोजकेच फर्निचर असल्याने घर ऐसपैस जाणवतं. घराच्या मागच्या बाजूला घोड्यांना, गाईंना आणि कुत्र्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेतच हिरवीगार झाडी आहेत. प्रार्थनाचं प्राणी प्रेम सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे प्रार्थना तिच्या या नवीन घरात छान रुळली आहे.