news

पूजा सावंतच्या लग्नात या मराठी कलाकारांची हजेरी …घेतलेला उखाणा आणि गळ्यातील सुंदर मंगळसूत्राने वेधलं लक्ष

काल बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणच्या लग्नाचा बार उडाला आहे. २ दिवसांपूर्वी मंगळवारी पूजाच्या घरी ग्रहमख पूजन पार पडले. या सोहळ्याला पूजाने निळ्या रंगाची भरजरी साडी, त्यावर दाक्षिणात्य डिझाईनची ज्वेलरी घातली होती. या पेहरावात पूजा सावंतचा लूक अधिकच खुलून दिसत होता. गेल्या अनेक दिवसांपासून पूजा सावंतच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली होती. आज तिच्या लग्नाच्या बातमीने या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. पूजा सावंत आता चव्हाण कुटुंबाची सून झाली आहे. तिच्या या लग्नाची धामधूम गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेली होती. ‘माझ्या लग्नाला यायला कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून मी मुंबईतच लग्न करणार’ असे तिने अगोदरच जाहीर केलेले होते. त्यानंतर प्रार्थना बेहरेसोबत जाऊन पूजाने तिच्या लग्नाची खरेदी केली होती.

१६ फेब्रुवारी रोजी साखरपुडा झाल्यानंतर २४ फेब्रुवारीला त्यांनी संगीत सोहळा आयोजित केला होता. त्यानंतर मेंदी, हळद, ग्रहमख अशा सोहळ्यानी तिच्या लग्नाच्या अगोदरच्या विधींना सुरुवात झाली होती. पूजा आणि सिद्धेशने हळदीला जांभळ्या रंगाची थीम निवडली होती तर इतरांना पिवळ्या रंगाची थीम देण्यात आली होती. हळदीला बुम्बरो बुम्बरो या गाण्यावर डान्स करायचा हे पूजाने अगोदरच ठरवले होते. रुचिरा ही पुजाची धाकटी बहीण पूजाला हळद लावताना रुचिरा आणि पूजाला दोघींनाही त्यांचे अश्रू अनावर झाले होते. तिच्या लग्नातले हे प्रत्येक क्षण तिने तेवढ्याच मोठ्या उत्साहाने साजरे केलेले पाहायला मिळाले. अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने पूजाच्या लग्नासाठी तिच्या आवडत्या जांभळ्या रंगाची ओढणी भेट स्वरूपात दिली होती. पूजा उखाणा घेताना म्हणते “सोन्याच्या ताटात चांदीची वाटी… सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सिद्धेश रावांचा नाव घेते सात जन्मांसाठी. “

pooja sawant wedding photos
pooja sawant wedding photos

पूजा आणि सिद्धेशच्या चार दिवस चाललेल्या ह्या लग्न सोहळ्याला मराठी सृष्टीतील बऱ्याचशा सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अमृता खानविलकर, शाल्मली तोळ्ये, अभिजित खांडकेकर, सुखदा खांडकेकर, भूषण प्रधान, गौरी महाजनी, गश्मीर महाजनी, वैभव तत्ववादी, मेधा मांजरेकर, गौरी इंगवले, भार्गवी चिरमुले, सचिन पिळगावकर, सई गोडबोले, मनीषा केळकर, ज्येष्ठ अभिनेत्री जीवनकला केळकर, पुष्कर जोग, मृण्मयी देशपांडे हे कलाकार आवर्जून हजेरी लावताना दिसले. सिद्धेश हा परदेशात वास्तव्यास आहे त्यामुळे पूजा सावंत लग्नानंतर काही दिवस तिकडेच राहणार आहे. पण सिद्धेशचं काम हे कायमस्वरूपी नसल्याने ते पुन्हा मायदेशी परततील असे पूजाने म्हटले होते. त्यामुळे पूजा सध्या तरी अभिनय क्षेत्रातून तात्पुरता ब्रेक घेताना दिसणार आहे. दरम्यान पूजा आणि सिद्धेश आज विवाहबद्ध होत आहेत याची उत्सुकता सकाळपासूनच शिगेला पोहोचली होती. लग्नाच्या काही वेळापूर्वी रुचिराने नवरीचा लूक कसा आहे याची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. पूजा या नवरीच्या लूकमध्ये खूपच खुलून दिसत होती. सिद्धेश चव्हाण आणि पूजा सावंत यांना आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button