मराठी मनोरंजन विश्वात निलेश साबळेने भरीव योगदान दिलेलं आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोचा विजेता बनल्यानंतर निलेश साबळेने होम मिनिस्टरची जबाबदारी सांभाळली होती. पण आदेश बांदेकर यांच्या लोकप्रियतेमुळे त्याला या शोमधून काढता पाय घ्यावा लागला. अर्थात यानंतर त्याने चला हवा येऊ द्याची धुरा तब्बल १० वर्षे यशस्वीपणे सांभाळलेली पाहायला मिळाली. आणि आता तो चला हवा येऊ द्या मधून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांसमोर एक चित्रपट घेऊन येणार आहे. निलेश साबळे हा पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी त्याच्या चाहत्यांना माहीत आहेत पण निलेश साबळे एका लेकीचा बाप आहे हे क्वचितच कोणाला माहीत असावे. डॉ गौरी सहस्रबुद्धे या आयुर्वेदिक तज्ञ असलेल्या मैत्रिणीसोबत निलेशचे प्रेमाचे सूर जुळले होते. कॉलेजमध्ये असल्यापासूनच हे दोघे प्रेमात होते.
गौरी देखील अतिशय कला प्रेमी मुलगी. तिला नाटकाची, गायनाची, चित्रकलेची विशेष आवड आहे. लग्नानंतर आजही ती सोशल मीडियावर तिच्या या कलेचे दर्शन घडवत असते. याशिवाय आरोग्याचे सल्ले देखील ती सोशल मीडियावर देत असते. गौरी अनेकदा तिच्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. पण धुलिवंदनाच्या निमित्ताने प्रथमच निलेश साबळेने त्याच्या लेकीला चाहत्यांच्या समोर आणले आहे. धुळवडीच्या शुभेच्छा देताना निलेश साबळेने प्रथमच त्याच्या लेकिसोबतचा फोटो शेअर केलेला पाहायला मिळाला. त्याच्या या क्युट लेकीला पहिल्यांदाच पाहून अनेकांना त्याला मुलगी सुद्धा आहे यावर विश्वास बसत नव्हता. कारण याअगोदर कधीच निलेशने त्याच्या लेकीबद्दल कुठेच काही बोललेले पाहायला मिळाले नव्हते.
अर्थात लेकीचं नाव त्याने अजूनही जाहीर करणे टाळले आहे. पण त्याच्या क्युट लेकीला पहिल्यांदाच पाहून आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. गौरी आणि निलेश हे दोघेही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. निलेश सध्या त्याचा हा पेशा बाजूला ठेवून आहे. पण लग्नानंतर त्याची अभिनय क्षेत्रातील ओढ पाहून गौरीनेच त्याला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला होता. गौरीच्या पाठिंब्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो असे तो अनेकदा म्हणाला आहे. मुंबईत घर घेण्याचं त्याचं स्वप्न चला हवा येऊ द्या मुळे पूर्ण झालं. या शोने आम्हाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं अशी या कलाकारांची नेहमीच प्रामाणिक प्रतिक्रिया असते. त्याचमुळे शोने निरोप घेतल्यानंतर ही कलाकार मंडळी भावुक झालेली पाहायला मिळाली होती.