news

नोकराणी, नासके, भुसनळ्या बिग बॉसच्या घरात वादाला नवे तोंड… वैभव जान्हवी एकत्रित भिडले निक्कीला

मराठी बिग बॉसच्या घरात एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. निक्कीला ए टीमच्या सदस्यांची चुगली दाखवल्याने ती खूपच भडकली आहे. ‘मी ए टीमच्या कुठल्याच सदस्याला बिग बॉसची ट्रॉफी जिंकू देणार नाही’ असेच मत तिने हे चुगलीचे व्हिडीओ पाहिल्यानंतर दिले होते. रितेश देशमुखने रविवारी निक्कीला तिच्याबद्दल घरात काय बोललं जातं याचे व्हिडीओ दाखवले होते. ए टीमचा चेहरा मोहरा समोर आल्याने निक्की आता या सगळ्यांना भारी पडली आहे. निक्की एकटी या सगळ्यांना भिडल्याने अरबाज, जान्हवी, निक्की सोबत त्यांचे चांगलेच वाद होऊ लागले आहेत.

vaibhav and jahnvi killekar bigboss marathi
vaibhav and jahnvi killekar bigboss marathi

नुकत्याच आलेल्या नव्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला ‘नोकराणी’ असा उल्लेख करते. पण यानंतर वैभव या वादात उडी मारतो .कॅप्टन बनायची लायकी नाही तुझी असे निक्की वैभवला म्हणताच वैभव तिला ‘ए नासके’ म्हणून भांडू लागतो. तेव्हा निक्की वैभवचा ‘भुसनळ्या’ असा उल्लेख करते. ए टीमचा हा वाद आता एका वेगळ्या लेव्हलला जाऊन पोहोचला आहे. एवढे दिवस बिग बॉसच्या घरात निक्की, अरबाज, जान्हवी , घनश्याम या चौघांची जोडी छान जुळली होती. पण निक्कीला तिच्या मागून काय बोलले जाते हे रितेशने समोर आणून दिले. मी तुमच्याबद्दल कधीच काही बोलत नाही पण तुम्ही माझ्याबद्दल खूप काही बोलत असल्याचं मला समजलं.

आता ए टीमशी माझा काहीच संबंध नाही आणि या टीमच्या कोणालाच मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकून देणार नाही ‘ असं चॅलेंजच तिने स्वीकारलेलं पाहायला मिळत आहे. निक्की आणि ए टीममध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे. बिग बॉसच्या प्रेक्षकांनाही असंच घडायला हवं होतं अशी प्रतिक्रिया देण्यात येत आहे. इतके दिवस जान्हवी आणि निक्कीने सगळ्यांचा अपमान केलेला पाहायला मिळाला पण याच दोघी आता एकमेकांच्या समोर यायलाही धजावत आहेत. एकमेकींबद्दलचा त्यांचा हा राग काही दिवस तरी प्रेक्षकांचे मनोरंजन करेल अशी आशा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button