“Baby shower “चे खास सेलिब्रेशन… मराठी अभिनेत्री नेहा गद्रे हिचे डोहाळेजेवणाचे फोटो होत आहेत व्हायरल
मराठी चित्रपट मालिका अभिनेत्री नेहा गद्रे ही सध्या तिचं आईपण अनुभवत आहे. नेहा गद्रे हिने तिच्या अभिनयाने मराठी सृष्टीचा एक काळ गाजवला होता. पण आता लग्नानंतर तिने या क्षेत्रातून काढता पाय घेतला. नवऱ्यासोबत परदेशात स्थायिक झालेल्या नेहाने मध्यंतरी परदेशातच शिक्षिकेची पदवी मिळवली होती. पण आता प्रेग्नन्सीच्या कारणास्तव तिने या व्यस्त शेड्युल मधून काढता पाय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी नेहा गद्रे हिने तिच्या प्रेग्नन्सीची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तेव्हा मराठी सेलिब्रिटींनी तिचे अभिनंदन केले होते.
आता नुकतेच नेहाने तिच्या बेबी शॉवर म्हणजेच डोहाळजेवणाचे व्हिडीओ शेअर केलेले आहेत. ‘मुलगा की मुलगी?’ असा एक खेळ या सोहळ्यात खेळला जातो. असाच खेळ पण एका वेगळ्या पद्धतीने त्यांनीही साजरा केलेला पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया मध्येच हा सोहळा त्यांच्या जवळच्या मित्रांनी आयोजित केला होता. नेहा गद्रे हिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी मालिका सृष्टीचा एक काळ गाजवलेला पाहायला मिळाला. मन उधाण वाऱ्याचे, गडबड झाली, मोकळा श्वास अशा चित्रपट मालिकेतून नेहाने प्रसिद्धी मिळवली आहे.
नेहा गद्रे सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे. ईशान बापट सोबत लग्न झाल्यानंतर तिने आपल्या घरसंसाराकडे लक्ष केंद्रित केले होते. साधारण दोन वर्षांपूर्वी नेहाने ऑस्ट्रेलियात राहून शिक्षिकेची पदवी मिळवली होती. ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेली नेहा आता लवकरच आई होणार आहे. नेहा आणि ईशानने ऑस्ट्रेलियातील टंगलूमा बीचवर फोटोशूट केलं होतं. अभिनय क्षेत्र सोडून ती आता तिची फॅमिली लाईफ एन्जॉय करत आहे. गडबड झाली हा तिने अभिनित केलेला शेवटचा चित्रपट ठरला होता.