मला तेव्हा कळलं असतं तर मी चप्पल फेकून मारली असती त्याला….अरबाजच्या एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा
मराठी बिग बॉसच्या ५ व्या सिजनमध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोघेही चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोघांमध्ये अफेअर आहे असेच चित्र ते प्रेक्षकांना दाखवत आहेत. पण हे सगळं अरबाज फुटेज मिळवण्यासाठी करतोय असा दावा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने केला आहे. अरबाज हा वेगवेगळ्या रिऍलिटी शोमधून प्रसिद्धी मिळवत आहे. शोमध्ये अफेअर दाखवल्याने त्याला सोशल मीडियावर लोक फॉलो करत आहेत. याच प्रसिद्धी पोटी तो लोकांच्या भावनांशी खळतोय असे स्पष्ट मत त्याची एक्स गर्लफ्रेंड नायरा आहुजा हिने व्यक्त केलं आहे. नायरा आहुजा आणि अरबाज पटेल दोघेही स्प्लिट्सव्हीलाच्या ५ व्या सिजनमध्ये स्पर्धक होते. या शोमध्ये दोघांच्या अफेअरची एकच चर्चा पाहायला मिळाली होती. नायराचे या शोमध्ये येण्याअगोदर ब्रेकअप झाले होते. पण अरबाजची जवळीक पाहून तो आपल्या प्रेमात आहे असे तो तिला भासवत होता.
अरबाज सतत नायराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. पण नायराला कुठेतरी वाटलं होतं की अरबाज आपल्याला फसवतोय. त्याची शोच्या बाहेर गर्लफ्रेंड आहे हे नायराला कुठूनतरी कळलं होतं. लिझा बिंद्रा ही अरबाजची गर्लफ्रेंड आहे. पण ती पंजाबी असल्याने आमचं लग्न होत नाही असं अरबाज बोलला असल्याचे तिला कळले. तेव्हा नायरा अरबाजला याबद्दल विचारू लागली. तेव्हा अरबाजने या सगळ्या गोष्टी नाकारल्या. पण शो संपल्यानंतर हे स्पर्धक एकत्र भेटण्यासाठी जमले तेव्हा अरबाज लिझाला भेटायला दिल्लीला जाणार हे तिला कळले. त्याच दिवशी नायराने अरबाजपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मला तिच्याबद्दल कळलं असतं तर मी चप्पल काढून त्याला मारलं असतं असं वक्तव्य नायराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. या दोघांच्या प्रेमाचे व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे तेव्हा ‘हे सगळं स्क्रिप्टेड आहे’ अशी कमेंट लिझा सोशल मीडियावर करत असे. “अरबाज आणि लिझा या दोघांचा हा ठरवून केलेला प्लॅन आहे. लिझासुद्धा त्याच टाइपची मुलगी आहे. जे हे दोघे लोकांना उल्लू बनवायचा प्रयत्न करतायेत. त्यांचे फॅन अगोदर मला लिझाचे व्हिडीओ पाठवायचे पण आता मला निक्की तांबोळीचे व्हिडीओ पाठवले जातात. मराठी बिग बॉसच्या शोमध्ये येण्याअगोदर लिझाने तिच्या इन्स्टाग्रामवर अरबाजची गर्लफ्रेंड असल्याचे एडिट केलं आहे. एवढंच नाही तर त्याच्यासोबतचे गायब केलेले व्हिडीओ ती पुन्हा शेअर करत आहे.
दोघांनी लग्न केलं असल्याचे फोटो व्हायरल करण्यात येत होते पण ते दोघेही प्रसिद्धी मिळवण्यासाठी असं नाटक करताहेत. अरबाजने स्प्लिट्सव्हीलामध्ये जे केलं तेच तो मराठी बिग बॉसमध्ये फॉलो करत आहे. त्याचा तो गेम प्लॅनच बनला आहे. इतक्या खालच्या पातळीला जाऊन खेळणारा पहिलाच व्यक्ती मी पाहिला आहे. लोकांची इच्छा आहे की मी मराठी बिग बॉसच्या घरात जावं आणि त्याचं पितळ उघडं करावं. पण असं मला वाटत नाही की माझ्या जाण्याने ते होईल, कारण मी त्याच्यात आता एवढी इंव्होल्ड झालेली नाही, पण निक्की तांबोळी स्मार्ट आहे ती त्याच्या बोलण्याला फसणार नाही. पण तिला जर माहीत आहे की त्याची अगोदरच एक गर्लफ्रेंड आहे तर मग निक्की एकदम चुकीचा संदेश देत आहे. मी जर आत गेले तर निक्कीला बाहेर काय चाललंय हे नक्कीच सांगेल. कारण ती जेव्हा बाहेर येईल तेव्हा तिच्याकडे तेवढीच बोटं उचलली जातील जेवढी माझ्यावर उचलली गेली. कारण भारतात मुलांना दोषी ठरवण्याआधी मुलींना प्रश्न विचारला जातो. “