news

‘नाच गं घुमा’ महिला प्रेक्षकांनी पुन्हा एकदा गाजवला चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई …. पहिल्याच दिवशी पहा किती कोटींचा जमवला गल्ला

काल १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ, सुकन्या कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, मधूगंधा कुलकर्णी, कविता लाड, आशा ज्ञाते, पूर्णिमा डे, ललित प्रभाकर अशी भलीमोठी स्टार कास्ट या चित्रपटाला लाभली आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, मधूगंधा कुलकर्णी यांना धरून सहा जणांनी केली. परेश मोकाशी यांनी स्वप्नील जोशीला चित्रपटाचे कथानक ऐकवलं तेव्हा स्वप्नीलने लगेचच हा चित्रपट निर्मिती करण्याचे ठरवले.

naach ga ghuma marathi film box office collection
naach ga ghuma marathi film box office collection

काही दिवसांपूर्वी नाच गं घुमा या चित्रपटाची घोषणा केली त्यावेळी यात नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता होती. त्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि अवघ्या २४ तासातच ४ मिलियन पेक्षा जास्त व्युव्ह्ज या ट्रेलरला मिळाले होते. तेव्हाच हा चित्रपट हिट होणार असे बोलले जात होते. दरम्यान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकारांनी कंबर कसली होती. मीडियाच्या माध्यमातून अनेक मुलाखती देत कलाकारांनी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. अखेर काल बुधवारी १ मे रोजी भारत आणि भारता बाहेर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. देशविदेशातील तब्बल ३५६ थिएटरमध्ये दररोज १३०० स्क्रीनवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील थिएटरमध्ये तर मराठी प्रेक्षकांनी घुमा गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. काल दिवसभर नाच गं घुमाचा आवाज थिएटरमध्ये दुमदुमला. या पहिल्याच दिवसात नाच गं घुमा चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तब्बल २ कोटी ५० लाखांची कमाई करत यशाचा पहिलाच टप्पा सर केला.

muktga barve in naach ga ghuma
muktga barve in naach ga ghuma

बाईपण भारी देवा, झिम्मा या चित्रपटानंतर महिला वर्गाने नाच गं घुमा हा चित्रपट पुन्हा एकदा चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला. त्यामुळे आठवडाभरात हा चित्रपट १० कोटींच्यावर कमाई करणार असा विश्वास वाटत आहे. दरम्यान हा चित्रपट १०० कोटींच्या आसपास कमाई करू शकतो असेही अनेकांचे म्हणणे आहे. महिलांनी उचलून धरलेला चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाणार आहे. वर्किंग वूमनसाठी कामवाली बाई किती महत्वाची असते हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे. ती ही एक माणूस आहे आणि तिलाही चांगली वागणुक मिळण्याचा हक्क आहे असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तिचे दोन हात आहेत म्हणूनच महिलांना घराबाहेर पडता येणे शक्य आहे. त्यामुळे बऱ्याच महिला त्यांच्या कामवाल्या बाईसोबत चित्रपट पाहायला आवर्जून हजेरी लावताना दिसत आहेत. चित्रपटामुळे हा बदल घडून येत असल्याने अनेकांनी या विचारांचे स्वागतच केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button