वर्ष संपताच अभिनेत्याने दिली प्रेमात असल्याची कबुली… मिस्ट्रीगर्ल आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक
काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय केळकर यांने त्याच्या गर्लफ्रेंड ला सर्वांसमोर रिव्हील केले होते. अक्षय सिंगल नसून तो त्याच्या रमाला डेट करतोय असे त्याने म्हटले होते. त्यानंतर गायिका साधना काकतकर हिला तो गेली १० वर्षांपासून डेट करत असल्याचे तो जाहीर करताना दिसतो. आता अक्षय केळकर पाठोपाठ आणखी एका अभिनेत्याने त्याचा सिंगल असण्याचा चाप्टर क्लोज केला आहे. वर्ष संपतंय आणि मी सिंगल असल्याचा चाप्टर क्लोज करतोय म्हणत अभिनेता सिद्धार्थ खिरीडने प्रेमात असल्याचे जाहीर केले आहे.
गर्लफ्रेंडचा पाठमोरा फोटो शेअर करत सिद्धार्थ खिरीडने प्रेमात असल्याचे जाहीर केले आहे. पण सिद्धर्थची ही गर्लफ्रेंड नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न त्याला विचारला जात आहे. दरम्यान सिध्दार्थच्या या बातमीवर मराठी सेलिब्रिटींनी त्याचे अभिनंदन केले आहे. शिवाय ही मिस्ट्रीगर्ल आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी तेही उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत.
सिद्धार्थ खिरीड याने नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमातून काम केलं आहे. बऱ्याच मालिकांमध्ये तो मुख्य भूमिकेतही पाहायला मिळाला आहे. सिद्धार्थ ला नृत्याची विशेष आवड आहे. त्याच्या डांसच्या व्हिडिओला चांगली पसंती मिळत असते. हृदयी प्रित जागते, राणी मी होणार अशा मालिकेतून तो मुख्य भूमिकेत झळकला आहे. मालिकेतला त्याचा कुल अंदाज अनेकांना भावला होता. तूर्तास सुध्दार्थ नेमका कोणाला डेट करतोय हे जाणून घेण्यासाठी सगळेचजण उत्सुक आहेत. त्याची ही गर्लफ्रेंड कोण आहे हे तो कधी जाहीर करणार याकडे सगळे डोळे लावून वाट पाहून राहतील.