
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची एक मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. या मुलाखतीत ती घटस्फोटानंतर समोरच्याला दोष नाही देणार असे म्हणताना दिसली. पुन्हा एकदा लग्न करण्याचीही तिने इच्छा व्यक्त केली. लग्न करायचंच आहे आणि ते प्रेम हवं आहे असे ती म्हणत आहे. पण अभिनेता शशांक केतकर सोबत तिने का घटस्फोट घेतला याचे कारण शशांकने सांगितले होते. शशांक आणि तेजश्री दोघेही होणार सून मी ह्या घरची मालिकेतून एकत्र काम करत होते. या मालिकेत काम करत असताना त्यांच्यात प्रेम जुळून आले. मालिकेच्या कलाकारांनाही त्यांच्या या अफेअरची कल्पना होती. त्यामुळे दोघांच्या लग्नावेळी कलाकारांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती.

पण एक वर्षाच्या आताच या दोघांचे खटके उडू लागले. अगदी मालिका चित्रित होत असतानाही हे दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. दोघांचे सीन कित्येकदा वेगवेगळे शूट केले जायचे. मालिकेच्या इतर कलाकारांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. ‘तेजश्री आपल्याला ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून सतत हिनवते, माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा अपमान करते’ असे म्हणत शशांकने घटस्फोटाचे कारण सांगितले होते. तेव्हा त्यांना कायदेशीररित्या घटस्फोट मिळाला. त्यादरम्यान शशांकने वकील असलेल्या प्रियांका ढवळेसोबत दुसरे लग्न केले. नुकतेच त्याचे चौकोनी कुटुंब पूर्ण झाले आहे. पण तेजश्री मात्र अजूनही सिंगल आहे.

एका चांगल्या जोडीदाराच्या ती प्रतीक्षेत आहे. शशांक सोबत लग्न होण्याआगोदर तेजश्रीने अगोदर एक साखरपुडा मोडला होता. इंजिनिअर असलेल्या राहुल डोंगरेसोबत तिचा साखरपुडा होणार होता. अरेंज मॅरेज पद्धतीने तिला राहुल डोंगरे सोबत लग्न करायचे होते. मात्र होणार सून मी ह्या घरची मालिकेमुळे ती शशांकच्या प्रेमात पडली होती. त्यामुळे साहजिकच राहुल सोबतचा साखरपुडा तिने रद्द केला होता.