news

५० शी ओलांडलेल्या मराठी अभिनेत्री या वयातही आहेत फिट… या ५ अभिनेत्री आजही दिसतात तितक्याच सुंदर

वय हा फक्त एक आकडा आहे. ५० शी ओलांडलेल्या अभिनेत्री या वयातही फिट राहून आपले सौंदर्य टिकवून ठेवताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच माधुरी दीक्षितने ५७ वा वाढदिवस साजरा केला पण या वयातही तिचे सौंदर्य अनेक तरुणींना लाजवेल असेच आहे. मराठी इंडस्ट्रीत सुद्धा अशा देखण्या अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची ५० शी ओलांडली तरी चेहऱ्यावर तेच तेज टिकवून ठेवले आहे. पाहुयात या अभिनेत्री आहेत तरी कोण ….

aishwarya narkar family photo
aishwarya narkar family photo

सध्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत विरोधी भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या नारकर यांचा जन्म १० मे १९७० साली झाला आज त्या ५४ वर्षांच्या आहेत. जवळपास २८ वर्ष त्या रंगभूमीवर काम करत आहेत. ऐश्वर्या नारकर यांनी ५० शी ओलांडली असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर तेज टिकून आहे. अर्थात हा फिटनेस राखून ठेवण्यासाठी त्या बरीच मेहनतही घेत असतात. योगा, नॅचरल स्क्रीन केअरिंग या गोष्टींमुळे त्यांनी त्यांचे सौंदर्य अजूनही टिकवून ठेवले आहे. सोशल मीडियावर त्या शेअर करत असलेल्या रिल्समध्ये त्यांच्या सोबत काम करणाऱ्या तरुण कलाकारांमध्ये त्यांचीच जास्त चर्चा पाहायला मिळत असते.

ashwini bhave family photo
ashwini bhave family photo

लग्न करून परदेशात राहिलेल्या अश्विनी भावे या देखील त्यांच्या निस्सीम सौंदर्याने अनेकांना भुरळ घालताना दिसतात. अश्विनी भावे यांचा जन्म ७ मे १९७२ साली झाला आज त्या ५२ वर्षांच्या आहेत. जवळपास २९ वर्ष त्या रंगभूमीवर काम करत आहेत. घरत गणपती या चित्रपटातून त्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. लिंबू कलरची साडी ही त्यांची आयकॉनीक ओळख आहे. चित्रपटात व्यस्त असताना आपलाही संसार व्हावा अशी ईच्छा त्यांची होती. किशोर बोपरडीकर यांचे स्थळ आले आणि अभिनय क्षेत्र सोडून त्या परदेशात स्थायिक झाली. मुलांचे पालनपोषण यातच रमल्यानंतर त्यांनी पुन्हा इंडस्ट्रीत येण्याचे ठरवले. हिंदी चित्रपटातही अश्विनी भावे यांनी प्रमुख नायिकेच्या भूमिका गाजवलेल्या पाहायला मिळतात. आजही त्यांच्या या सौंदर्याचे कौतुक होताना पाहायला मिळते.

nishigandha wad family photo
nishigandha wad family photo

अभिनेत्री निशिगंधा वाड यांनीही वयाची ५० शी ओलांडली आहे. पण या वयातही त्या तेवढ्याच देखण्या दिसतात. निशिगंधा वाड यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९६९ साली झाला आज त्या ५५ वर्षांच्या आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत निशिगंधा वाड यांनी प्रमुख नायिका म्हणून काम केले. हिंदी सृष्टीत देखील त्यांनी सहाय्यक भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. त्यांच्या सौंदर्या इतकीच त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेची , वक्तृत्व कौशल्याची नेहमीच चर्चा पाहायला मिळत असते. अर्थात आई विजया वाड यांच्याकडूनच त्यांना हे बाळकडू मिळाले होते.

nivedita ashok saraf family photo
nivedita ashok saraf family photo

निवेदिता सराफ या देखील कित्येक तरुणींना त्यांच्या सौंदर्याने मात देतात. चेहऱ्यावरचे स्मित हास्य आणि डोळ्यातले भाव यामुळे पाहणाऱ्याच्या मनात त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण होते. निवेदिता सराफ यांचा जन्म ६ जून १९६५ साली झाला आज त्या ५९ वर्षांच्या आहेत. बालवयातच त्यांनी हिंदी चित्रपटातून कामे केली आहेत. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांनी अपनान या हिंदी सिनेमात काम केलं. सराफ यांच्या लग्न केल्यानंतर निवेदिता सराफ जवळजवळ इंडस्ट्रीतून गायबच झाल्या होत्या. पण कालांतराने अनिकेत मोठा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा या इंडस्ट्रीत पुनरागमन केले. अगबाई सासूबाई या मालिकेत तर त्यांनी प्रमुख भूमिकाच साकारलेली पाहायला मिळाली होती.

mrunal kulkarni family photo
mrunal kulkarni family photo

अभिनेत्री आणि दिग्दर्शिका, लेखिका म्हणून मृणाल कुलकर्णी यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. मृणाल कुलकर्णी यांचा जन्म २१ जून १९७१ साली झाला. आज मृणाल कुलकर्णी ह्या ५३ वर्षांच्या झाल्या असल्या तरी त्याच्या चेहऱ्यावर तेच तेज आहे. त्यांनी अभिनयाची सुरुवात अल्पवयातच मराठी दूरदर्शनवरील स्वामी या मालिकेपासून केली. तेव्हा त्या बारावीत शिकत होत्या. स्वामीमधे त्यांनी माधवराव पेशवे यांच्या पत्‍नी रमाबाईंची भूमिका साकारली. अनेक मराठी चित्रपटात काम केल्यांनतर त्यांनी तरुण वयात काही हिंदी चित्रपटात देखील कामे केली. कुछ मीठा हो जाये, छोडो कल की बातें असे चित्रपट तर सोनपरी सारख्या हिंदी मालिकेत त्या झळकल्या. व्यवसायाने वकील असलेल्या श्री रुचिर कुलकर्णी यांच्याशी मृणाल यांचा विवाह झाला आहे. मृणाल यांचा मुलगा विराजस हा सुद्धा अभिनेता असून त्यानी नुकतीच अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button