मुंबई ही कलाकारांची कर्मभूमी मानली जाते. खरं तर गाव खेड्यातून प्रत्येक कलाकार हा मुंबईच्या दिशेने धाव घेत असतो. इथे आपल्याला मनाजोगतं काम मिळेल याची त्यांना शाश्वती असते. पण मुंबई सारख्या ठिकाणी साधं भाड्याने घर घेऊन राहायचं म्हटलं तरी ते खिशाला न परवडण्यासारख असतं. पण एकदा का कलाक्षेत्रात जम बसला की आपल्या हक्काचं घरही व्हावं अशी ते अपेक्षा बाळगून असतात. त्यामुळे स्वस्तात घर घेण्यासाठी कलाकारांना म्हाडाची मदत घ्यावी लागते. कलाकार कोट्यातून आजवर अनेक कलाकारांना म्हाडाची घरं मिळाली आहेत.
नुकत्याच झालेल्या सोडतीत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बने आणि गौरव मोरे यांना लॉटरी लागली आहे. गोरेगाव येथील फक्त २ घरासाठी एकूण २७ कलाकारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात गौतमी देशपांडे म्हाडाची लॉटरी लागली आहे. निखिल बनेला कन्नमवारनगर येथे म्हाडाचं घर मिळालं आहे. तर पवई मधील दोन घरांवर गौरव मोरे आणि शिव ठाकरे यांना ताबा घेता येणार आहे. पवईतील या उच्च श्रेणीतील घरांच्या किंमती या जवळपास १ कोटी ७८ लाख इतक्या आहेत पण कलाकार कोट्यातून या कलाकारांना ही घरं कमी किंमतीत दिली जातात.
गोरेगाव इथल्या दोन घरांसाठी २७ कलाकारांनी अर्ज दाखल केले होते. मराठी बिग बॉसच्या सिजन ३ चा विजेता विशाल निकम, संचित चौधरी, किशोरी शहाणे, नारायणी शास्त्री, गौतमी देशपांडे, शेखर नार्वेकर या तब्बल २७ जनांमधून गौतमी देशपांडेला या घराची लॉटरी लागली आहे. या बातमीमुळे गौरव मोरे, निखिल बने, शिव ठाकरे, गौतमी देशपांडे खुश झाले आहे. मुंबईत आपलं हक्काचं घर असावं ही त्यांची इच्छा आता लवकरच गृहप्रवेश केल्यानंतर पूर्णत्वास येईल.