news

अभिनेत्री मेघना एरंडे हिला पितृशोक… बाबा तुम्हाला खूप मिस करते म्हणत केली भावनिक पोस्ट

अभिनेत्री मेघना एरंडे हिला पितृशोक झाला आहे. मेघना एरंडे हिचे वडील सुधीर एरंडे यांचे काल संध्याकाळी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यात निधन झाले आहे. त्यामुळे एरंडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. वडिलांच्या अशा निधनाने ‘एक उत्स्फूर्त व्यक्तिमत्व गमावलं ‘ अशी खंत मेघनाने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. देव त्यांना स्वर्गात जागा देवो अशी भावपूर्ण श्रद्धांजली तिने वडिलांना वाहिली आहे. मेघना एरंडे खूप कमी वयातच अभिनय क्षेत्रात दाखल झाली होती. तिने अनेक दूरदर्शनवरील मालिकेत भूमिका साकारल्या होत्या. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती व्हाईस ओव्हर आर्टिस्ट देखील आहे. अनेक कार्टून कॅरॅक्टर्सला तिने आवाज दिला आहे. या क्षेत्रात येण्याला तिच्या वडिलांचा मोठा हातभार होता. मेघनाच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी सतत केले होते.

meghana erande father sudhir erande
meghana erande father sudhir erande

त्यांच्यातला हा उत्साहीपणा मेघना मध्ये देखील पाहायला मिळतो. त्याचमुळे वडिलांच्या खूप जवळ असलेल्या मेघनाला वडिलांचे असे जाणे मनाला चटका लावून गेले आहे. मेघनाने नुकतीच एक पोस्ट शेअर करत हि दुःखद बातमी दिली आहेत ती म्हणते ” With a very heavy heart informing you all that we lost our father Mr sudhir Erande on 27 th feb evening in Pune. He was a gem ..A very warm person…You will be missed so much baba May God Grant Eternal Peace to the departed soul ! Om Shanti Leena & Meghana Erande ” या दुःखातून तिला सावरण्याचे बळ मिळो हीच सदिच्छा….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button