news

या अभिनेत्यासोबत रेश्मा शिंदे होणार विवाहबद्ध?…तो मिस्ट्रीमॅन आहे तरी कोण?

लवकरच रंग माझा वेगळा मालिका अभिनेत्री रेश्मा शिंदे विवाहबंधनात अडकणार आहे. दोन दिवसांपूर्वी रेश्मा शिंदेचं केळवण साजरे करण्यात आले. रंग माझा वेगळा या मालिकेच्या कलाकारांनी एकत्र येऊन हे सेलिब्रेशन थाटात केले होते. आशुतोष गोखले याने रेश्माला उचलून घेत तिला घरापर्यंत आणले आणि सगळ्यांनी तिचे स्वागत केले. हर्षदा खानविलकर, अनघा भगरे, अंबर गणपुले, मेघन जाधव, ऋतुजा बागवे, शाल्मली तोळे, विदिशा म्हसकर असे सेलिब्रिटीयावेळी एकत्र जमले होते. अन्नपूर्णेला वंदन करून रेश्माने ताटात वाढलेले सर्व पदार्थ संपवून मन तृप्त केले. रेश्माने या केळवणाचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करताच तिच्या लग्नाच्या बातमीने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

reshma shinde kelwan photos
reshma shinde kelwan photos

पण रेश्मा कोणासोबत लग्न करतेय हे अजूनही तिने गुलदस्त्यात ठेवलं आहे. रेश्माने २०१२ साली अभिजित चव्हाण सोबत पहिले लग्न केले होते. मात्र २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यानंतर रेश्मा सिंगल असल्याचे दिसून आले. पण मधल्या काळात ती अभिनेता अक्षर कोठारी सोबत एकत्रित पाहायला मिळाली. अनेकदा या दोघांना एकत्र पाहिल्याने दोघे प्रेमात असल्याचे बोलले जाऊ लागले. अक्षर कोठारी हा देखील पहिल्या लग्नापासून विभक्त झाला आहे. सध्या झी मराठीच्या सावळ्याची जणू सावली या मालिकेत त्याची पहिली बायको मानसी नाईक सहाय्यक भूमिकेत दिसत आहे. मानसी नाईक हिने अक्षर कोठारीपासून घटस्फोट घेतला त्यानंतर तिने धृवेश कापुरीया सोबत लग्न केले.

reshma shinde wedding kelwan photos
reshma shinde wedding kelwan photos

तर अक्षर कोठारी सध्या लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. रेश्माच्या केळवणानंतर अक्षर कोठारी आणि रेश्मा शिंदे दोघेही लग्नबांधनात अडकणार अशी चर्चा पहायला मिळत आहे. या बातमीवर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही. पण दिवाळीच्या शुभेच्छा देताना रेश्माने काही व्हिडीओ शेअर केले होते. या व्हिडिओत एक सफेद रंगाच्या कुर्त्यामध्ये एक हँडसम तरुण दिसत आहे. बहुतेक हा रेश्मा शिंदेचा होणारा नवरा असावा असे अंदाज काही चाहत्यांनी लावलेले पाहायला मिळतात. त्यामुळे त्या व्हिडिओतील तो तरुण नेमका आहे तरी कोण? याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे. पण येत्या काही दिवसात यावरचा पडदा रेश्मा शिंदेकडूनच लवकर हटवला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button