काही दिवसांपूर्वी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदय विकाराचा झटका येऊन गेला होता. मृत्यूच्या दारातून मी परत आलोय हा माझा पुनर्जन्म आहे असे श्रेयस या घटनेबाबत बोलतो. या कठीण प्रसंगी पत्नी दिप्तीने वेळीच तत्परता दाखवून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यावेळी अनेक अनोळखी व्यक्तींची तिला मदत मिळाली होती. हा अनुभव पाहून यासर्वांमागे कुठेतरी देव आहे असा विश्वास दिप्तीला वाटू लागला. श्रेयस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता तेव्हा त्याचे असंख्य चाहते तो बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत होते. या घटनेवर प्रकाश टाकणाऱ्या अनेक मुलाखती सध्या श्रेयस आणि दीप्ती देत आहेत. अशाच एका मुलाखतीत श्रेयसने लग्नानंतरचा एक मजेशीर किस्सा शेअर केलेला पाहायला मिळतो.
श्रेयस आणि दीप्ती देघांचे लव्हमॅरेज आहे. २५ डिसेंबर रोजी होणाऱ्या कॉलेजच्या सोहळ्यात श्रेयसला आमंत्रण देण्यात आले होते. या सोहळ्याचे आयोजन दिप्तीने स्वतः केले होते. २१ डिसेंबरला श्रेयसला आमंत्रण देण्यापासून ते सगळे मॅनेजमेंट तिने जुळवून आणले होते. हे पाहून श्रेयसला दिप्तीचे फार कौतुक वाटले. पहिल्या भेटीनंतर चारच दिवसात श्रेयसने दिप्तीला प्रपोज केले होते. त्यावेळी दीप्ती पुढील शिक्षणासाठी परदेशात जायला निघाली होती. पण काही कारणास्तव तिचे अमेरिकेला जाणे रद्द झाले. अडीच वर्षांच्या मैत्रीनंतर दिप्तीने श्रेयसला होकार दिला. डिसेंबर २००५ मध्ये त्यांनी मोठ्या थाटात लग्न केले. लग्नानंतर हे दोघेही एकत्र कुटुंबात राहत होते. त्यानंतर त्या दोघांनी कुटुंबापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. हा मजेशीर किस्सा श्रेयसने मुलाखतीत शेअर केला आहे. लग्नाअगोदर मला स्वयंपाक बनवायला येतो अशी थाप श्रेयसने मारलेली होती. भाड्याच्या घरात राहायला आल्यानंतर आता सकाळी खायचं काय ? असा प्रश्न दिप्तीने विचारला तेव्हा, ‘मला स्वयंपाक येत नाही’ असे म्हणत श्रेयसने हात वर केला. दीप्तीच्या माहेरी देखील तीच्या हातात चहा मिळायचा त्यामुळे तिला स्वयंपाक करायचा कधी प्रश्नच आला नव्हता.
शिवाय यादरम्यान ती मानसोपचार तज्ञ म्हणून काम करत असल्याने सकाळीच तिला घर सोडावे लागायचे. जेवणाचा प्रश्न मिटावा म्हणून दिप्तीने स्वयंपाक करण्यासाठी एक मोलकरीण ठेवली होती. ती रोजचा स्वयंपाक बनवू लागली होती. पण श्रेयसला फुलाबाईच्या हातचा स्वयंपाक मुळीच आवडत नसायचा. एक दिवस सकाळीच दीप्ती ऑफिसला गेल्यानंतर साडेसात वाजता घराची बेल वाजली. श्रेयस त्यावेळी झोपेतच होता. दार उघडण्यासाठी तो गेला आणि समोर फुलाबाईला पाहिले. फुलाबाई घराच्या आत येण्याच्या तयारीतच होत्या तेवढ्यात श्रेयसने त्यांना ‘जा’ असं म्हटलं. ‘आं, ‘म्हणजे आज जायचंय? आज नाही का यायचं?. ‘ असं फुलाबाईच्या प्रश्नावर श्रेयसने स्पष्टच म्हटलं की, ‘आज नाही, परत कधीच नाही यायचं’. आता ईथुनपुढे फुलाबाई येणार नाही म्हटल्यावर दिप्तीला मोठा प्रश्न पडला, पण त्यानंतर दीप्तीने सगळा स्वयंपाक शिकून घेतला. ‘आता ती उत्तम स्वयंपाक बनवते’ असे श्रेयस दिप्तीच्या स्वयंपाका बद्दल सांगतो.