
सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाचा वापर तुमच्या प्रसिद्धीसाठी केला जातो. अभिनय क्षेत्रात येण्यासाठीची एक संधी म्हणूनही या माध्यमाकडे पाहिलं जातं. एवढंच नाही तर चर्चेत राहण्यासाठी तुम्ही या माध्यमाचा वापरही करून घेऊ शकता. पण हो यातून तुम्ही चुकीचा तर मार्ग निवडत नाही ना? हाही प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. पिंकीचा विजय असो ही स्टार प्रवाहची मालिका खूप गाजली होती. या मालिकेतील एक अभिनेत्री सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

पिंकीचा विजय असो मालिकेत निरीचे पात्र तुम्हाला आठवत असेलच. ही भूमिका सकारली होती अभिनेत्री सारिका साळुंखे हिने. सारिका साळुंखे हिने सुरुवातीला शाळा या वेबसिरीजमध्ये काम केले होते. त्यानंतर तिला ही मालिका मिळाली होती. मालिकेनंतर सारखा ‘कात्री’ या शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत झळकली. वरदाराजू गोविंदम या तेलगू चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पाऊल टाकले. मराठीत सोज्वळ, सालस भूमिकेत दिसलेल्या सारिकाने मात्र गेल्या वर्षी उल्लु या अडल्ट वेबसिरीज मध्ये बोल्ड सीन देऊन तरुणाईचे लक्ष वेधून घेतले.
या वेबसिरीजमुळे सारिका रातोरात प्रकाशझोतात आली. पण यानंतर आता सारिकाने एक बिकिनी व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून काहींनी तिला “वाट चुकलेली मराठी अभिनेत्री” म्हटलं आहे. अ डल्ट वेबसिरीज केल्याने सारिकावर आता बोल्ड अभिनेत्रीचा ठपका पडला आहे. आता तिला अशाच भूमिका करायच्या आहेत का? हा प्रश्न तिच्या या बिकिनी व्हिडीओ नंतर नेटकऱ्यांनाही पडला आहे.