
कलाकारांना त्यांच्या कामाचं मानधन लवकर मिळत नाही. या मुद्द्यावर अनेक दिग्गज कलाकारांनी भाष्य केलंय. परंतु आजही हा प्रश्न सुटलेला नाही. यामुळं सर्वात जास्त हाल होतात ते दुय्यम फळीत काम करणाऱ्या कलाकारांचे. काम आणि मानधनाची अनिश्चितता यामुळं त्यांच्या कुटुंबांचेही आर्थिक हाल होत असल्याचं चित्र आहे. असं असलं तरी कलाकार कधीही हार मानत नाहीत. अनेक कलाकारा सध्या विविध क्षेत्रात काम करताना दिसत आहेत.
त्यात जर संकट पोटच्या मुलाच्या आजाराचं असेल तर असा कलाकार बाप काय करू शकतो हे दाखवून दिलं आहे अभिनेता अतुल वीरकर याने. मुलगा प्रियांशच्या दुर्धर आजारावरील उपचारासाठी पैसा जमवण्याकरीता अभिनयासोबत अतुलने चहा नाष्ट्याची व्हॅन सुरू केली होती. सध्या तो शूटिंग आणि फूड व्हॅन सांभाळत मुलाच्या उपचारासाठी पैसे जमवत आहे.

आता ह्यात भर करत “देवगडचा हापूस” आंबा आणि पायरी आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला तसेच ओल्या काजूच्या बिया यांचा व्यवसाय ते गेली २ वर्ष करत आहेत ह्याही वर्षी श्री स्वामीच्या आशीर्वादाने आम्ही आंब्याचा श्री गणेशा करत आहोत असं म्हणत त्यांनी ग्राहकांना मागणी आणि चव पाहता यंदा मोठ्या प्रमाणात “प्रियांश मँगोज ” ग्राहकांसाठी ओपन केलं आहे. अभिनेता अतुल वीरकर आणि त्यांच्या पत्नीला या व्यवसायात यश येवो हीच सदिच्छा….