news

हो मी पुन्हा एकदा प्रेमात पडले…मानसी नाईक पेक्षा ८ वर्षाने लहान असलेला बॉयफ्रेंड पहा नक्की आहे तरी कोण

आजकाल ब्रेकअप आणि लग्न या दोन गोष्टी सहजसोप्या घडु लागल्या आहेत. बॉलिवूड सृष्टीत दोन तीन लग्न झाल्याशिवाय कलाकारांचे समाधान होत नाही असे सर्रास पाहायला मिळते पण आता मराठी इंडस्ट्रीत देखील या गोष्टी अनुकरणीय ठरत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने तिच्या ब्रेकपची घोषणा केली होती. विजय पलांडे ह्याच्यासोबत भाग्यश्रीचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर हे दोघे लग्न कधी करणार अशी चर्चा सुरू असतानाच तिने विजय पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तर त्याअगोदर मानसी नाईक हीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केलेला होता. काही दिवसांपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण झाली असून मानसी नाईक कायदेशीर पद्धतीने परदीप खरेरापासून वेगळी झालेली पाहायला मिळाली.

manasi naik boyfriend rahul khismatrao
manasi naik boyfriend rahul khismatrao

केवळ पैशासाठी परदीपने माझ्यासोबत लग्न केलं होतं असा आरोप मानसीने लावला होता. त्यामुळे मानसी नाईक पूर्णपणे खचून गेली होती. पण स्वामीच आपल्याला या दुःखातून बाहेर काढतील असा तिचा विश्वास होता. पण घटस्फोटाच्या चर्चेनंतर मानसी नाईकने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपलाही घरसांसार असावा, मुलं बाळं असावीत असे तिचे एक स्वप्न तिने बोलून दाखवले होते. आणि त्यानंतर मानसी नाईक खरोखरच पुन्हा एकदा प्रेमात पडलेली पाहायला मिळते आहे. काही दिवसांपूर्वी मानसीने मीडियाला मुलाखत दिली होती. त्यात तिने एका खास व्यक्तीसोबत तिचा वाढदिवस साजरा केल्याचे सांगितले होते. पॅरिसमध्ये आयफिल टॉवर समोर मानसीने तिच्या बर्थडेचं सेलिब्रेशन केलं होतं पण तिच्या सोबत असलेला तो व्यक्ती कोण हे तिने गुलदस्त्यात ठेवले होते. पण काल मानसीने तिच्या या बॉयफ्रेंडचे फोटोसाहित नाव रिव्हील केले आहे.

rahul khismatrao girlfriend manasi naik
rahul khismatrao girlfriend manasi naik

मानसी नाईक ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे राहुल खिस्मतराव. राहुल हा मुंबईचाच असून तो सायंटिस्ट आहे. ‘द थेअरी ऑफ क्रिएटर’ या पुस्तकाचे त्याने लेखन केले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. मोठमोठ्या राजकीय व्यक्तींसोबत त्याचा संबंध आहे. Akhed फाउंडेशन या सामाजिक संस्थेशीही तो जोडला गेलेला आहे. त्यामुळे राहुल खिस्मतराव हे महाराष्ट्रातील एक मोठं व्यक्तिमत्व म्हणावं लागेल. मानसी नाईकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर राहुलने मानसीला लग्नासाठी प्रपोज केले आहे. पॅरिसमध्ये त्याने मानसीसाठी एक सरप्राईज प्लॅनिंग करून ठेवले होते. मानसीचा यावर्षीचा बर्थडे राहुलने खास अंदाजात साजरा केलेला पाहायला मिळाला. बॉयफ्रेंडचे नाव समोर आल्यानंतर आता मानसी नाईक राहुल सोबत लग्न कधी करणार याचीच तिचे चाहते वाट पाहून आहेत. तूर्तास मानसीने यावेळी एका मराठी मुलाची निवड केल्याने तिचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button