स्वतःच्या हक्काचं घर असावं या आशेने कलाकार मंडळी अहोरात्र मेहनत करत असतात. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांचे हे स्वप्न सत्यात उतरलेले पाहायला मिळाले. मन उडू उडू झालं मालिका फेम कार्तिक म्हणजेच अभिनेता ऋतुराज फडके याचेही घर घेण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. मन उडू उडू झालं मालिकेनंतर ऋतुराजला मोठी प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर तो अनेक मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला.
आपली माणसं येऊन भेटून गेली.. कारण लवकरच सांगतो म्हणत त्याने काल मालकेतील अभिनेते घरी आल्याचे काही फोटो शेअर देखील केले होते. ऋतुराज म्हणतो ” स्वतःच हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. प्रीती आणि मी बरीच स्वप्नं पाहिली, त्यातलच एक स्वप्नं म्हणजे “आपलं स्वतःच हक्काचं घर”. ते कसंही असो, लहान किंव्हा मोठं, पण ते आपलं स्वतःच असावं. जानेवारी २०२३ मध्ये आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर आम्ही दोघंही आमच्या कामात busy झालो त्यामुळे अंबेजोगाईला जाऊन आमची कुलदेवी योगेश्वरी आणि गुहाघर ला जाऊन व्यडेश्वरच्या दर्शनाचा योग काही आला नाही.
अधिक महिन्यात आम्हाला जसा वेळ मिळाला तसं आम्ही कर्जतला जाऊन व्यडेश्वर आणि योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले आणि ओटी भरुन आलो. देवीचे आभार मानले आणि बऱ्याच गोष्टींसाठी प्रार्थना केली. काही दिवसां पूर्वी, आमचं “आपलं स्वतःच घर” हे स्वप्न पूर्ण झालं आणि आमची पहिली दिवाळी आज आम्ही आमच्या स्वतःच्या घरी साजरी करतोय. योगायोग म्हणजे त्या बिल्डिंगचं नाव “योगेश्वरी”. ते म्हणतात ना, “अगर किसी चीज़ को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है”.. हे आम्ही अनुभवलं. कालच्या मुहूर्तावर घराची पूजा करून त्यांनी नव्या स्वप्नांचा अनुभव घेतला.