‘सुलोचना दीदी आणि मधु आपटेंचा भावूक किस्सा’…ती १६१ चांदीची नाणी पाहून मधु आपटे ढसाढसा रडले होते
शरीराने किरकोळ असणाऱ्या मधु आपटे यांना आर्थिक परिस्थितीमुळे खूप कष्टाची कामं करायला लागायची. एकदा मधु आपटे यांचे अडखळत बोलणे पाहून फत्तेलाल यांनी १९३६ सालच्या ‘संत तुकाराम’ चित्रपटात त्यांना अभिनयाची संधी देऊ केली. मधू आपटे यांचा अभिनय केलेला हा पहिला चित्रपट ठरला होता. यानंतर मधू आपटे यांना अभिनय क्षेत्रात फारसे यश मिळाले नाही. १९४४ सालच्या ‘भावबंधन’ या नाटकात त्यांना लता मंगेशकर यांच्यासोबत काम केले. विविध नाटकातून छोट्या छोट्या भूमिका साकारत असतानाच त्यांची सुलोचना दिदींसोबत ओळख झाली. कित्येकदा मधु आपटे यांना सुलोचना दिदींसोबत सेटवर जाण्याची संधी मिळाली.
सुलोचना दिदींच्या सांगण्यावरून मधु आपटे यांना हिंदी चित्रपट निर्माते छोट्या छोट्या भूमिका देऊ लागले. मधू आपटे यांनी आपल्या अडखळत बोलण्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करत अनेक विनोदी भूमिका साकारल्या. दरम्यान सुलोचना दीदी आणि मधु आपटे यांचे घनिष्ट संबंध जुळले होते. घरातील सदस्याप्रमाणे ते मधु आपटे यांचा सांभाळ करत असत. अर्थात कलाकारांच्या मदतीला त्या नेहमीच धावून असत, शूटिंग संपल्यानंतर कलाकार, बॅक आर्टिस्ट यांना ते आवर्जून गिफ्ट देत असत. सुलोचना दीदींनी त्यांच्या घरी मधु आपटे यांची एकसष्ठी थाटामाटात साजरी केली आणि एकशे एकसष्ठ चांदीची नाणी भेट देऊ केली. तेव्हा दिदींचं हे निर्व्याज प्रेम पाहून मधु आपटे ढसाढसा रडू लागले.
मधु आपटे असे का असा प्रश्न अनेकांना पडतो त्याच झालं असं मधू यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या आई आपल्या तिन्ही मुलांना घेऊन भावाकडे राहायला आल्या. मुलांचे पालनपोषण व्हावे म्हणून लोणची, पापड विकायच्या. वयाच्या ९ व्या वर्षी मधु आपटे यांना भयंकर ताप आला, या तापातच त्यांची वाचा सुद्धा गेली. पुढे मिरजेच्या डॉ वानलेस यांच्याकडे घश्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हा कुठे मधु आपटे यांना अडखळत का होईना बोलता येऊ लागले. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने मधु आपटे यांनी जेमतेम ५ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे मामाच्या ओळखीने त्यांना प्रभात फिल्म कंपनीत काम मिळाले.