लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे खासकरून त्यांच्या पहिल्या पत्नी रुही
लक्ष्मीकांत बेर्डे ९० च्या दशकातला सुपरस्टार जो आजही मराठी चित्रपट प्रेमींच्या हृदयात घर करून आहे. आजही प्रेक्षक लक्ष्मीकांतचे चित्रपट तितक्याच आवडीने पाहताना दिसतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पहिले लग्न रुही बेर्डेसोबत झालं होतं. रुही बेर्डे यांचं लग्ना आधीच नाव पद्मा असं होत. पद्मा म्हणजेच रुही हिने अभिनयाची सुरवात “आ गले लगजा” या हिंदी चित्रपटातून केली होती. पुढे मराठी नाटकांत रुहीने नशीब आजमावल त्यात तिला चांगलं यश देखील मिळालं. डार्लिंग डार्लिंग या नाटकातून तिच्या अभिनयाची जोरदार सुरवात झाली. ह्याच नाटकामुळे “जावई विकत घेणे आहे” आणि “पांडू हवालदार” “आराम हराम आहे” या चित्रपट तिची वर्णी लागली. पुढे मुंबईचा फौजदार, दोस्त असावा तर असा, दुनिया करी सलाम या चित्रपटांत रवींद्र महाजनी आणि अशोक सराफांसोबत त्या झळकल्या. लक्ष्मीकांत आणि रुहीची भेट मराठी नाटकांमुळेच झाली वेडी माणसं, कशात काय लफड्यात पाय ह्या नाटकांमुळे त्यांची घट्ट मैत्री झाली.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रुही यांच्यासोबत कमाल माझ्या बायकोची या चित्रपटांमध्ये काम केलं होते. या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अलका कुबल यांच्या पतीची भूमिका साकारली होती, तर रूही या चित्रपटात दुसऱ्या भूमिकेत होत्या. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रुही यांच्यासोबत १९८५ लग्न केलं होतं. लग्नानंतर लक्ष्मीकांतच आयुष्यच बदलून गेलं तो काळ त्याच्यासाठी सर्वात उत्तम काळ ठरला एकामागून एक सिनेमे त्याला मिळत गेले. खरंतर रुहीनेच लक्ष्मीकांतला अनेक चित्रपट मिळवून दिले होते. तो एक उत्तम कलाकार आहे त्याला संधी द्या तो त्या संधीच सोनं करेल असं त्या म्हणायच्या. पण नंतर लक्ष्मीकांत प्रिया यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ते प्रिया यांच्यासोबत लिव्हइनमध्ये राहत होते. यादरम्यान, रुही यांचं कॅन्सरच्या आजारानं निधन झालं. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया यांच्याशी लग्न केलं. पण लग्नाआधीच प्रिया गरोदर होत्या हे देखील प्रियाने एका मुलाखतीत म्हटले होते. ह्याच कारणामुळे प्रियाला आजही ट्रोल केलं जात. वयाच्या १८ व्या वर्षी प्रिया बेर्डे यांनी वडीलांच्याच चित्रपटात डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली.
त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांचं इंडस्ट्रीत नाव झालं होतं त्यांच्या आजूबाजूला नेहमी स्पॉटबॉय, मेकअपमन अशी माणसं असायची त्यामुळे या व्यक्तीच कौतुकच वेगळं असे म्हणत प्रिया बेर्डे लक्ष्मीकांत पासून काहीशा लांबच राहत होत्या. पण मग दोघांची ओळख कशी वाढली. प्रिया सांगताना त्या म्हणाल्या की, ” आम्ही एकत्र काम करत असताना मला तो गिरगावकर म्हणून त्याच्यातला माणूस जाणवला. मग आमच्यात मैत्री झाली पण त्यावेळी खूप कळतंय असंही माझं वय नव्हतं तेव्हा मी १९ वर्षांची होती. आमच्या वयात १६ ते १७ वर्षांचे अंतर होते. मला माझ्या घराची जबाबदारी सांभाळायची होती त्यामुळे मला काम करणं भाग होतं. मला त्यांचा सपोर्ट मिळाला तेव्हा मी त्यांची मैत्री स्वीकारली. माझ्या आई मध्ये आणि त्यांच्यात खूप छान बॉंडिंग होतं. रुही पण माझ्या आईची चांगली मैत्रीण होती, पण मग असं काही डोक्यात नव्हतं की असं काही होईल. पण माझी आई जेव्हा खूप आजारी पडली तेव्हा मला त्या एकटेपणात आधाराची गरज वाटली. आईच्या आजारपणात मी त्यांच्या जवळ गेले आणि तेही माझ्या जवळ येत गेले.
मला तो माणूस म्हणून कळायला लागला ते स्क्रीनवर जेवढे उथळ वाटतात तसे ते अजिबात नव्हते ते खूप विचारी होते.मी त्यांच्याकडे गुरू म्हणूनही बघत होते माझ्या त्यांच्याबद्दल संमिश्र भावना होत्या. त्या वयात प्रेम असणं ही गोष्टच मला समजत नव्हती. पण लोकं मला आजही होम ब्रेकर म्हणतात. हे काळाच्या ओघात तुमच्या नशिबात ज्या गोष्टी लिहिलेल्या असतात तसं घडतं त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. ह्या गोष्टी घडल्यानंतर रुहीचे निधन झाले होते.” लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अगोदर रुही बेर्डे यांनी मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीत नाव कमावले होते. तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव कुठेच नव्हते. रुहीमुळेच लक्ष्मीकांत बेर्डे यांना पाठिंबा मिळत गेला, याचा खुलासा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका जुन्या मुलाखतीत केला होता. तर रुहीमुळे लक्ष्मीकांतचं नाव झालं ही गोष्ट प्रिया बेर्डे देखील मान्य करतात.