या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. आपण काय होतो ह्या पेक्षा आपल्याला काय बनायचं ह्यासाठी जर मनाशी जिद्द ध्येय बांधलं तर हवं ते साध्य करता येत हे एका तमाशातील लावणी कलावंताने करून दाखवलं आहे. तमाशा म्हटलं कि नाचणारी बाई म्हणून समाज नेहमी हिणवतो हे तर खुद्द लावणी साम्रादनी सुरेखा ताई पुणेकर यांचं विधान. असंच काहीसं घडलं ते लावणी कलावंत सुरेखा खोले यांच्या बाबतीत. परिस्थिती बेताची वडील ड्रायवर आणि आई घरकाम करायची. पण शालेय जीवनापासून सुरेख खोले प्रत्येक बाबतीत पुढे असायची मग तो डान्स असो वा एखादा खेळ. लहान वयातच त्यांनी कराटे क्लास लावले होते स्पर्धेसाठी चक्क काठमांडूला जायची संधी आली होती.
आता इतक्या दूर जायचे तर किमान ५ ते ८ हजार तरी लागणार मग हे पैसे आणणार कुठून असा प्रश्न तिच्यापुढे होता. एका डान्सच्या कॉम्पिटिशनमध्ये तिने सहभाग घेण्याचे ठरवले पण आपले वडील नकार देतील म्हणून तिने ते त्यांच्यापासून लपवून ठेवले. या स्पर्धेत सुरेखाने पहिला नंबर पटकावला आणि तेरा हजारांचे बक्षीस मिळाले. डिलांनी शिक्षण पूर्ण करायचं या अटीवर काठमांडूला जाण्याची परवानगी दिली. पण सुरेखा लावणीवर डान्स करतीये म्हटल्यावर नातेवाईकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. तमाशात काम करतीये असे म्हणून सगळे जण हिनवु लागले. लोक आपल्याला नावं ठेवतायेत हे सुरेखाच्या जिव्हारी लागले, त्यानंतर तिने एमपीएससीची तयारी केली.
दहावीला तिला केवळ पंचेचाळीस टक्के गुण मिळवले होते. यादरम्यान सुरेखा राज्यभर लावणीचे दौरे करत वेळ काढून एमपीएससीची तयारी करत असे. पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सुरेखाच्या आई वडिलांना खूप आनंद झाला. सुरेखा भिनयाची आवड जोपासत एक चित्रपट व वीस अल्बममध्ये झळकली. कलाक्षेत्रातील कामगिरीबद्दल सुरेखाला गदिमा पुरस्कार आणि राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने गौरविण्यात आले. लावणी करायला मला अजूनही आवडते मात्र त्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असे सुरेखाला वाटते. सुरेखा म्हणते की आजकाल लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य सादर करणाऱ्या मुलींनी लावणीचा आदर केला पाहिजे. आपले शिक्षण करून त्यांनी समाजापुढे एक आदर्श घडवला पाहिजे.