झी मराठी वाहिनीने गेल्या काही दिवसांत शिवा, पारू, नवरी मिळे हिटलरला आणि पुन्हा कर्तव्य आहे यासारख्या नवीन धाटणीच्या कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. या सर्वच मालिका टॉप १५ ते २५ च्या घरात प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. पारू ही मालिका १६ व्या स्थानावर आहे. त्या खालोखाल झी मराठीच्या मालिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनी लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. चार बहिणींना आईची माया देणारा “लाखात एक आमचा दादा” अशा आशयाची ही नवी मालिका असणार आहे. नुकतेच या मालिकेच्या पहिल्या पोस्टरची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
चार बहिणी आणि त्यांच्या मध्ये पाठमोरा उभा असलेला दादा असे या पोस्टरमध्ये पहायला मिळत आहे. आईवडिलांच्या पश्चात चार बहिणींचा सांभाळ करणारा हा दादा कोण असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या मालिकेत नेमके कोणकोणते कलाकार झळकणार हे वाहिनीने गुलदस्त्यात ठेवले आहे. पण एक छान कौटुंबिक मालिका पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांनी या मालिकेचे स्वागत केलेले पाहायला मिळत आहे. दरम्यान झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेला प्रेक्षकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मालिका वाढवत राहण्यापेक्षा ती वेळीच संपवावी अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या वेळेत ही मालिका प्रसारित केली जाईल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. येत्या काही दिवसात या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येईल तेव्हा मालिकेच्या कलाकारांबाबत एक एक उलगडा होत जाईल.
चार बहिणी आणि त्यांना सांभाळणारा एक भाऊ ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच उत्सुक आहेत. लवकरच या मालिकेच्या प्रसारणाची तारीख जाहीर करण्यात येईल तेव्हाच झी मराठीची कोणती मालिका निरोप घेते याचे स्पष्टीकरण मिळेल. दरम्यान श्वेता शिंदे हिने या मालिकेच्या बाबत एक हींट दिली आहे. लाखात एक आमचा दादा ही मालिका श्वेता शिंदे निर्मित करत आहे. तिने या मालिकेच्या नायकाचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. त्यावरून हा नायक लागीरं झालं जी फेम नितीश चव्हाण असेल असे अंदाज बांधण्यात आले आहेत. तर काहींनी उत्कर्ष शिंदे असेल असे अंदाज बांधले आहेत. या मालिकेचा पहिला प्रोमो आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसमोर आला आहे आणि त्यात नितीश चव्हानच प्रमुख भूमिका साकारत असल्याचे समोर आले आहे.