news

कुणाल ठाकूर आणि नृत्यांगना तसेच अभिनेत्री मुक्ती मोहनचे नुकतेच झाले लग्न फोटो होत आहेत व्हायरल

सध्या मराठी सृष्टीसह बॉलिवूड सृष्टीत देखील लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ऍनिमल चित्रपट अभिनेत्याचा मोठ्या थाटात विवाहसोहळा पार पडला आहे. एनिमल चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटातील अभिनेता कुणाल ठाकूर याने प्रसिद्ध नृत्यांगना तसेच अभिनेत्री मुक्ती मोहन सोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांनी आज रविवारी इन्स्टाग्रामवर त्यांच्या चाहत्यांसह आणि सह कलरांसह ही बातमी शेअर केली आहे. त्यांच्या लग्नातील काही खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलिवूड सृष्टीतील कलाकारांची लग्न म्हटली की त्याचा थाट काही वेगळाच असतो. त्यामुळे मुक्ती मोहन आणि कुणाल ठाकुरच्या लग्नावर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

kunal thakur and mukti mohan wedding photos
kunal thakur and mukti mohan wedding photos

मुक्ती मोहनच्या लग्नसोहळ्यात तिच्या बहिणींनी देखील रंगत आणली होती. मुक्ती मोहन बद्दल सांगायचं झालं तर ती एक अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. तिची बहीण शक्ती मोहन देखील एक प्रसिद्ध नृत्यांगना आहे. मुक्ती जरा नचके देखा, नच बलिये, फियर फॅक्टर आणि झलक दिखला जा ६ या सारख्या रिऍलिटी शोमधुन प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने साहेब, बीवी और गँगस्टर, दारूवु, हेट स्टोरी, मुरान आणि कांची यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि गाण्यांमध्येही काम केले आहे. तर अभिनेता कुणाल ठाकूरबद्दल सांगायचे झाले तर, तो ऍनिमल या चित्रपटात दिसला होता, जिथे त्याने रश्मिका मंदनाच्या परदेशाहुन परतलेल्या मंगेतराची भूमिका केली होती. रणबीर कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मिनी वेब शोमध्ये कुणालला सबा आझादसोबत पाहिले होते.

kunal thakur and mukti mohan wedding news
kunal thakur and mukti mohan wedding news

मुक्ती ही नीती मोहन आणि शक्ती मोहन यांची बहीण आहे, ज्या इंडस्ट्रीतही खूप प्रसिद्ध आहेत. शक्ती मोहन हिने डीआयडी शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर ती या शोमध्ये ग्रुपची प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळू लागली. शक्ती मोहन मुळेच तिच्या बहिणींना लोकप्रियता मिळाली असे बोलले जाते. पण तुमच्याकडे खरे टॅलेंट असेल तर तुम्ही सुद्धा या सृष्टीत तग धरू शकता असे मुक्तीच्या बाबत घडलेले पाहायला मिळाले. रश्मी देसाई यांच्यासह बॉलिवूड तसेच हिंदी मालिका सृष्टीतील कलाकारांनी मुक्ती मोहन आणि कुणाल ठाकुरचे अभिनंदन केले आहे आणि या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button