news

त्यामुळे तो माझ्यावर संशय घेऊ लागला पण मग….रिंकूने सांगितले किरण करमरकर सोबत घटस्फोटाचे कारण

मराठी मालिका चित्रपट अभिनेता किरण करमरकर याने त्याचीच सह कलाकार रिंकू धवन सोबत प्रेमविवाह केला होता. पण लग्नानंतर अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला. हिंदी बिग बॉसच्या १७ व्या सिजनमध्ये रिंकूने सहभाग घेतला होता त्यावेळी तिने तिच्या घटस्फोटावरचा पडदा हटवला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या रिंकूने सिद्धार्थ कन्ननला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बराच खुलासा केला आहे. किरण सोबत प्रेम कसे जुळले आणि घटस्फोट का झाला याबद्दल ती म्हणते की, “किरण आणि मी एकाच मालिकेत काम करत होतो कहाणी घर घर की मालिकेच्या सेटवर आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. मी लहानपणीच मालिकेतून काम करत होते त्यामुळे मी बिनधास्त मुलगी होते. मला सेटवर कोणाची तरी सोबत हवी होती, किरण हँडसम आणि एक टिपिकल मराठी मुलगा होता त्याच्याशी फ्लर्ट करायला मला आवडायचं.

kiran karmarkar with wife rinku dhwan
kiran karmarkar with wife rinku dhwan

त्यावेळी मी आणखी एका व्यक्तीच्या प्रेमात होते. मला घरी जायला वेळ नसायचा मी पंजाबी बिनधास्त मुलगी शूटिंग संपलं की पार्टीला जायचं ड्रिंक घ्यायचं, ड्राइव्ह करायचं पुन्हा कामाला लागायचं. चार तास मला वेळ मिळायचा तेव्हा घरी जाण्यापेक्षा मी कोणाच्याही को ऍक्टर्सच्या घरी जाऊन झोप आणि अंघोळ करायचे. पण एवढ्या वर्षानंतर कोणाशी तरी लग्न करायचं म्हणून मी घरच्यांना त्याचे नाव सांगितले. किरणच्या घरचे खूप स्ट्रिक्ट होते त्यामुळे त्याने आमच्या नात्याबद्दल घरी सांगितलं नव्हतं. आपले सगळे मित्र सेटल होतायत आता आपणही लग्न करू म्हणून मी त्याच्या मागे लागले. आमच्या दोघांची कास्ट वेगळी त्यामुळे मला हे लग्न होईल की नाही यावर मला थोडी शंका होती. पण एका क्षणी तर किरणने मला सांगितलं की तू माझ्या टाईपची मुलगी नाहीस जिला मी शोधतोय मग मीही काहिच घडत नाही म्हणून वेळ वाया घालवतेय अस वाटू लागलं मी दिसायलाही देखणी नसल्याने मी त्याचा विषय सोडून देण्याचं ठरवलं पण एके दिवशी शूटिंग आटोपून मी कहाणी घर घर की मालिकेच्या सेटवर नाईट शिफ्टला चालले होते माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी राजू खेर यांना ड्रॉप करण्यासाठी विचारले तेव्हा त्यांना भेटवण्यासाठी मी किरणला मेसेज केले राजू सर निघून गेले तरीही किरण गेटजवळ आला नाही. मी राजू सोबत होते म्हणून तो चिडला पण सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर त्याने मला माझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली. आमचे लग्न पाच सहा वेळा पुढे ढकललं पण नंतर आम्ही मोठ्या थाटात लग्न केलं. मी लग्न केलं हे माझ्या एक्सला फक्त एकदाच फोन करून सांगितलं त्यानंतर त्याचंही लग्न झालं. “

kiran karmarkar son
kiran karmarkar son

किरण सोबत घटस्फोट का घेतला? हा प्रश्न विचारताच रिंकुला रडू कोसळलं. स्वतःला सावरत ती म्हणते की, “कुठे बिनसलं हे नक्की आठवत नाही पण आम्ही एकदिवस वेगवेगळ्या खोलीत झोपू लागलो. आमचं घर सुरळीत चाललं होतं मुलगा मोठा होतोय पण आमच्या नात्यात दुरावा आला होता मी घरी जायचे तेव्हा मला त्याच्याशी बोलू वाटायचं, दिवसभरच त्याला शेअर करावंसं वाटायचं पण तो लाईट बंद करून झोपलेला असायचा. तो मला इग्नोर करू लागला. त्याला या इंडस्ट्रीत काम नव्हतं त्याला मी जबाबदार ठरवत होता. आमच्यात भांडणं होऊ लागली पण इशांत समोर आम्ही कधीच भांडलो नाही. आम्ही दोघे वेगवेगळ्या रूममध्ये झोपतोय एवढी त्याला समज नव्हती. मला गप्पा मारायला आवडायच्या पण तो बोलत नसल्याने मला त्या एकटेपणाची कुठेतरी सवय होऊ लागली. मी दिवसभर काय करते कोणाशी बोलते याचा त्याला हिशोब पाहिजे होता ते मला खटकलं. तो माझ्यावर संशय घेऊ लागला. पण एक दिवस भांडणं एवढी विकोपाला गेली की मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतरही मी त्याच्याकडून कधी पैसे घेतले नाही त्यामुळे घटस्फोट घेतल्यावरही मी त्याच्याकडून काहीच घेतलं नाही. आम्ही घटस्फोट घेतला त्यानंतर दीड वर्षाने मीडियाला खबर लागली. तेव्हा सगळ्यांनी मला विचारण्यास सुरुवात केली.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button